अकोट(दीपक रेळे)- शेतकऱ्यांनी G M बियाण्यांची लागवड करून भारतीय शेती क्षेत्रातच जणू नव्या क्रांतीची पेरणी केली.जनुक संशोधीत बियाण्यांच्या मान्यतेबाबत सरकारच्या अनास्थेला व निर्णयहीनतेला कंटाळून आज अकोली जहाँगीर येथील शेतकरी ललित पाटील बहाळे यांनी या बीज तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे पहिले HTBt कापूस व Bt वांग्याच्या पहिल्या बिजाची पेरणी केली 1500 शेतकरी या प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे होते.दोन एकर क्षेत्रांवर ही लागवड करण्यात आली.शेतकऱ्यांसाठी बाजारपेठा व अद्यावत तंत्रज्ञानासाठी आग्रही असलेल्या शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना त्यांच्या निवडीचे बियाणे मिळण्यासाठी शेतकरी संघटना लढा देत आहे.या हंगामात देशभरातून शेतकरी शेतीक्षेत्रात जैवतंत्रज्ञानाला HTB t कापूस व Bt वांग्याची पेरणी करून पाठींबा जाहीर करणार आहेत.
अलीकडेच हरियाणा येथे दोन शेतकऱ्यांना जनुक संशोधीत GM वांग्यांची पेरणी केल्याबद्दल दोषी ठरवून त्यांच्या शेतातील पीक प्रशासनाने नष्ट केले होते.अकोली जहाँगीर येथे आज जमलेल्या शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांची संपत्ती नष्ट केल्याबद्दल व त्यांच्या उत्पन्नाचे नुकसान केल्याबद्दल त्यांना प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली व सदर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधी संकलनाचे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी बोलतांना ललीत पाटील बहाळे म्हणाले की शेतकरी मागील काही वर्षांपासून चोरून HTBt कापसाची लागवड करत आहेत या सत्याग्रहामुळे आम्ही अभिमानाने या बियाण्यांची लागवड करू व शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करून शेतीक्षेत्रातीलअवाजवी बंधने नाकारण्यासाठी शेतकऱ्यांना बळ देण्यासाठीचा हा सत्याग्रह आहे.आज सरकारी बंदीमुळे चोर बीटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपयुक्त तंत्रज्ञानाला हक्काची बीटी अशी योग्य व सन्मानजनक ओळख या सत्याग्रहामुळे मिळणार आहे व तंत्रज्ञानाच्या निवडीच्या शेतकऱ्यांच्या मागणीला बळ या सत्याग्रहामुळे मिळणार आहे.
ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनेचे तंत्रज्ञान आघाडी चे प्रमुख अजित नरदे या प्रसंगी बोलतांना म्हटले GM तंत्रज्ञान फक्त शेतकऱ्यांसाठी गरजेचे नसून तर ते देशाच्या आर्थीक संपन्नतेसाठीही गरजेचे आहे.तेलबियांमधील जनुक तंत्रज्ञानामुळे आपण खाद्यतेलाची आयात कमी करू शकू,पिकांमधली विविधता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची संधी ही या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणार आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिलजी घनवट या प्रसंगी बोलतांना जगभरात डझनभर पेक्षा अधीक पिकांत जनुक संशोधीत तंत्रज्ञानाचे बियाणे वापरले जातात. मका,कापूस,सोयाबीन,मोहरी अशा अनेक पिकांत जनुक संशोधीत बियाण्यांचा वापर केला जातो.मानवजातीसह पशुसुद्धा गेल्या दोन दशकांपासून जनुक संशोधीत बियाण्यांनी उत्पादीत अन्नाचे,चाऱ्याचे सेवन करत आहेत कुणाच्याही आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचे आढळून आले नाही.एकीकडे जनुक संशोधीत बियाण्यांमुळे पर्यावरण प्रदूषित होत असल्याचा दावा केला जातो उलटपक्षी जनुक संशोधीत बियाण्यांमुळे कीटकनाशकांचा वापर कमी होत असल्यामुळे ते पर्यावरणपुरकच आहेत हे समजून घेतले पाहीजे.जनुक संशोधीत बियाण्यांमुळे मित्रकीटकांना हानी पोहचत नाही.जनुक संशोधीत बियाणे जैवविविधतेला समृद्ध बनवतात,पिकांचे नुकसान कमी होऊन अधीक जमीन शेतीखाली आणण्याची गरज निर्माण होत नाही.
या प्रसंगी विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केलेत.परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातून सहकुटुंब कार्यक्रमासाठी आलेले गजानन देशमुख यांनी आपले अनुभव मांडले.गेल्या 50 वर्षांपासून आमचे कुटुंब कापूस उत्पादन करत आहे 2014- 15 पासून बोलगार्ड 2 कापसात कीड प्रतिबंध कमी झाल्यामुळे व किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्यांनी कापूस उत्पादन थांबवले होते जेंव्हा त्यांनी HTBt कापूस बियाण्याबाबत ऐकले तेंव्हा त्यांनी HTBt कापूस बियाण्याचा प्रयोग करण्याचे ठरविले.प्रयोग म्हणून त्यांनी 3 एकर HTBt कापूस बियाण्यांची लागवड केल्याचे सांगितले. दोन एकरांत बोलगार्ड 2 कापूस बियाण्यांची लागवड केल्याचे सांगितले. HTBt ची परीक्षा करण्यासाठी मी कुठलाही कीटकनाशकांचा फवारा काढला नाही.तणनाशकाचे दोन फवारे काढले.HTBt कापूस क्षेत्रात माझा निंदण्याचा व डवरण्याचा पूर्ण खर्च वजा झाल्याचे त्यांनी सांगितले.बोलगार्ड 2 कापसाच्या क्षेत्रात एकरी 7 क्विंटल तर HTBt कापूस क्षेत्रात खर्च कमी होऊन एकरी 12 क्विंटल कापसाचे उत्पादन झाल्याचे सांगीतले., या अनुभवामुळे या वर्षी HTBt कापसाचे क्षेत्र वाढवून 5 एकरापर्यंत वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील छोटे शेतकरी अनिल चव्हाण यांनी आपले अनुभव मांडतांना आपण 80 च्या दशकापासून आपले कुटुंब कापूस लागवड करत असल्याचे व 2016 पासून HTBt कापसाकडे वळल्याचे त्यांनी सांगितले.HTBt कापूस वाणामुळे आपला मजुरीवरील उत्पादनखर्च एकरी 8000 रु पर्यंत कमी झाल्याचे व दर्जेदार कापूस उत्पादनामुळे हमीभावापेक्षा 25% अधीक भाव आपल्या कापसाला मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
हरियाणा च्या फतेहबाद जिल्ह्यातून आलेले शेतकरी नेते जनुक संशोधीत वांग्याबाबत आपले अनुभव मांडतांना म्हणाले की एका एकरात 300 क्विंटल पर्यंत उत्पादन होत होते पण किडीच्या प्रादुर्भावामुळे 150 ते ते 200 क्विंटल वांग्यांनाचं बाजार मिळू शकल्याचे सांगितले.आता जनुक संशोधीत वांग्याच्या बियाण्यांमुळे किडीचा प्रादुर्भाव शून्यवत होऊन संपूर्ण उत्पादन बाजारयोग्य होऊ लागले.सुदृढ व तेजस्वी रंगाच्या जनुक संशोधीत वांग्यांना बाजारात उत्तम भाव मिळू लागला असल्याचे त्यांनी सांगीतले.
यवतमाळ जिल्ह्यातील खाजगी वाहनाचा चालक गोविंद रामदास शहाणे HTBt कापूस बियाण्यांमुळे कापूस लागवडीकडे परत वळल्याचे सांगितले. त्याला एकरी 7.5 क्विंटल कापसाचे उत्पादन होत होते.गेल्या वर्षी HTBt कापसापासून 6 एकरांत 50 क्विंटल कापसाचे उत्पादन झाल्याचे आपल्या अनुभवात सांगितले. कार्यक्रमादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी HTBt कापसाबाबत आपले अनुभव कथन केलेत व शेतकरी म्हणून आपल्या आयुष्यात तंत्रज्ञानाने सकारात्मक बदल आणले असल्याचे सांगीतले.
हरितक्रांती पश्चात कापूस उत्पादन ही भारतीय शेतीतील मोठी यशोगाथा बनली आहे.आयात करणाऱ्या देशापासून प्रमुख निर्यातदार देशांमध्ये आपला समावेश झाला आहे.ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर हे शक्य झाले त्या शेतकऱ्यांना मात्र आजही आधुनिक बियाण्यांपासून वंचीत ठेवले जात आहे.HTBt कापसावरील बंदीमुळे शेतकऱ्यांना अनधिकृत बियाणे विकत घेण्यास भाग पाडले जात आहे.अनधिकृत बियाण्यांमुळे बीजवाईतील खोटारडेपणाचा व पीकाच्या नुकसानीचा धोका शेतकऱ्यांना संभवतो.शेतकऱ्यांच्या संभाव्य नुकसानासाठी सरकार जबाबदार असून सरकारने आता त्वरित जनुक संशोधीत बियाण्यांना व HTBt कापूस वाणाला शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन परवानगी द्यावी.
एकीकडे सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याविषयी गप्पा मारतांना दिसते त्याचवेळी सरकारने जनुक संशोधीत बियाण्यांवरील अवाजवी बंधने हटवून शेतकऱ्यांना उच्च उत्पादनाचा व उत्पन्नाचा लाभ सरकारने सरकारने अशी भावना आज शेतकऱ्यांच्या तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रहादरम्यान शेतकऱ्यांमध्ये प्रकर्षाने दिसून आली.
अधिक वाचा : संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने मंगरुळपीर येथिल नागरिकांना दिले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola