हिवरखेड (दिपक रेळे) – उपचाराविना मृत्यू झालेल्या महिला वाहक सौ. शीला सफल वाकोडे यांच्या मृत्यूप्रकरणी दिनांक 19 जून रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि जिल्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात धडक दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी सदर मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि हा दुर्दैवी मृत्यू टाळता आला असता काय याबाबत चाचपणी केली. तसेच येथील उपलब्ध औषध साठा स्वच्छता इतर मूलभूत सुविधांचा सुद्धा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. जैव कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता उपाययोजना करण्यासंदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली. हिवरखेड येथून अकोला येथे रुग्णांना रेफर करण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्यांनी हिवरखेड येथून कमीत कमी रुग्ण अकोला येथे रेफर करण्यात यावे. तसेच शक्य तेवढे उपचार हिवरखेड येथेच व्हायला पाहिजे असे सख्त निर्देश संबंधितांना दिले. सोबतच माता आणि बालमृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी करण्याबाबत प्रयत्न करण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी अकोट तहसीलदार तेल्हारा यांच्यासह मोठा ताफा या वेळी उपस्थित होता.
अधिक वाचा : वैभव पाटील हे मनमिळावू व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात – डॉ शेख चांद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola