बाळापूर (डॉ शेख चांद)– अकोला एलं सी बी, बाळापूर, वाडेगांव , चान्नी , बोरगांव मंजु , दहीहंडा, अकोला जिल्यातील इत्यादी ठिकाणी आपल्या ३ वर्षा च्या कारर्कीदीत कर्तव्यदक्ष राहुन अतीशय इमानदारीने , चांगल्या लोकांना सोबत घेऊन आपल्या पदावर राहुन उत्तम सेवा दिली आहे. तसेच त्यांचा अवैध धंदे करणाऱ्यांन मध्ये धाक होता. व आज ही आहे. तसेच या ३ वर्षा च्या कार्यकाळात लोकाभिमुख कामे केली, पोलीसा प्रती असलेली वाईट प्रकारची भीती लोकान मथुन दूर केली, लोकांना जाणीव करून दिली की पोलीस म्हंणजे तुम्ही पण एक पोलीस आहत. त्या प्रमाने समाजात वाईट घङत असते, अपघात, किंवा कोणती घटना घडत असते त्या वेळेस तुम्ही लोक पोलिसांचाच काम करीत असतात, आज समाजाला तुमच्या सारख्या चांगल्या लोकांची गरज आहे.
गोरगरीब महीला , युवक, वृध्द , यांना वेळो वेळी आर्थिक , वस्तु , अन्नदान , सामाजीक , धार्मीक कार्यक्रमात देणगी दिली, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, स्पर्धा परीक्षा देत असलेल्या विद्यार्थांना घरी बोलावून मार्गदर्शन केले, तसेच प्रत्येक धर्माच्या धार्मिक उत्सवात जसे दुर्गा उत्सव, गणेश उत्सव, शिवजयंती, डॉ बाबासाहेब जयंती, महात्मा ज्योतीबा फुले जयंती , महावीर जयंती, हनुमान जयंती , बुध्द जयंती, मोहरम, ईद, उर्स, यात्रा, दिवाळी, शैक्षणिक कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमात एका सामान्य नागरीका प्रमाणे लोकान मध्ये मिसळून सर्व सन वेळेच्या आत शांततेत पार पाडेले. तसेच प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला इतर धर्माच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे प्रोत्साहन दिले . यामुळे त्यांच्या कारकीर्दीत कोणत्याच प्रकारचा गंबीर गुन्हा घडला नाही. आपत्कालीन परिस्थीतीत स्वतःच्या जिवाची काळजी न करता परिस्थीतीवर नियंर्तन आणण्याचा काम केले, तसेच वरीष्ठ अधिकारी , कर्मचारी यांच्या सोबत कुटुंबा प्रमाणे संबंध ठेवले , २४ तास आपल्या कार्याची सेवा दिली असून अशा हुनंरी व्यक्ती महत्त्व असलेले वैभव पाटील यांची पदोन्नती ठाणेदार म्हणून लोणावळा येथे झाली आहे आज त्यांची ऐ पी आय वरून पी आय म्हणून पदोन्नती झाल्याने त्यांनी त्यांच्या निरोप समारंभा प्रसंगी सांगीतले की मला वाडेगांव हे गांव लकी लागले असून खरोखरच या गांवाचे सर्वं समाजातील लोक एका कुटुंबा प्रमाने राहातात त्यांच्याच आर्शिवादाने आज माझी पदोन्नती झाली आहे याचे श्रेय हे सर्व पातूर -बाळापूर , वाडेगांव वासीयांना देत आहे . त्याच प्रमाणे मला वेळोवेळी मदत करणाचे आधिकारी, पोलीस कर्मचारी, समाजातील युवक , नागरीक , पत्रकार, राजकीय व्यक्ती यांचे आभार मानावे तेवळे कमी आहे. असे त्यांनी म्हटले आहे . वाडेगांव येथील नारायण महाराज संस्थान येथे वैभव पाटील यांना मित्रमंडळ तसेच बाळापूर -पातूर तालुक्यातील नागरीकांन कडून निरोप व पुढील वाटचाली करीता शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सर्व राजकीय पदाधिकारी , जि प सदस्य , पं स सदस्य , ग्रां पं सरपंच , उपसरपंच , सदस्य, पत्रकार मंडळी ,शिक्षक , डॉक्टर , वकील , प्रतिष्ठीत नागरीक , सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी , गावकरी व मित्र मंडल उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र पल्हाडे , सुभाष मसने, प्रशांत मानकर मा. उपसभापती , मंगेश राहुडकर उपसरपंच, अय्याज साहील, डॉ शेख चांद , दत्ता मानकर, राजवर्धन डोंगरे, सदानंद भुस्कुटे, बाबुराव फाटकर, सुनिल मानकर, रंजीत अहीर, विजय काळे, अशोक घाटोळ , मो अफ्तार , श्रीकांत ताले सर, नितीन मानकर सर, डॉ प्रा जगदीश चिंचोलकार सर, विनोद राहुडकर , इत्यादी नी सहकार्य केले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन शिवाजी म्हैसने यांनी केले प्रस्थावीक मानीक मानकर सर यांनी केले . अध्यक्षीय भाषण सुभाष जैन यांनी केले आभार राजेंद्र पल्हाडे यांनी केले.
अधिक वाचा : सिटी कोतवाली पोलिसांची वरली अड्ड्यावर धाड, मुद्देमालासह आरोपींना अटक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola