अकोट(प्रतिनिधी)– उद्या दि. २० जून गुरुवार रोजी ठिक सकाळी ११.०० वाजता नगरपरिषद आकोट येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख तुषार पुंडकर यांचा नेतृत्वात नगरपरिषद प्रशासनाच्या घरकुल विरोधी धोरणाच्या विरोधामध्ये तसेच जो पर्यन्त घरकुल लाभार्त्याना त्यांचा हक्काचे घरकुल तसेच शहरातील गुंठेवारी प्रकरणे निकाली काढत नाहीत नोटरी ताबा पावती ग्राहय धरल्या जात नाही तोपर्यंत नागरपालिकेवर घरकुल अर्जदार मुकक्का करतील ऐक तर हक्काचे घर दया नाही तर घरकुल अर्जदारांचा नगर पालिकेत मुकक्का. आकोट नागरपरिषदे मध्ये २०१३ पासुन रमाई घरकुल योजने अंतर्गत लोकांनी अर्ज केले आहे.
६ वर्ष झाली परंतु त्यांचा हक्काचे घरकुल मिळाले नाही. पंतप्रधान घरकुल योजने साठी गुंठेवारी भुखंड असल्यास त्याला मान्यता देत नसल्या मुळे घरकुला पासुन अर्जदार वंचित आहेत. आकोट शहरातील बहुतांशभाग हा गुंठेवारी असल्यामुळे खरेदी विक्री होत नाही तसेच तो घरकुलासाठी सुद्धा पात्र होत नसल्या मुळे गुंठेवारी नियमाकुल करा.जे अर्जदार सरकारी जागेवर रहिवासी आहेत त्यांचा नावे जागा करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ दयावा.जे घरकुल अर्जदार भाड्याने किवा अर्जदारा कळे घरकुलासाठी जागा उपलब्ध नसल्यास त्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी किवा घरकुल सदनिका देण्यात यावी.
नॉटरी ताबाईमला पावती याना मान्यता देवून अर्जदाराना त्यांचा हक्काचे घरकुल देण्यात यावे उपविभागीय तसेच तहसीलदार यांनी प्रमाणित केलेल्या एन. एपी ३४ तसेच ३६ ग्राहय धरून घरकुल दयावे तसेच घरबांधकाम परवानगी देण्यात यावी .स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावी या सर्व मागण्यांन साठी जास्तीत जास्त संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान प्रहार जनशक्ती पक्षाच्या शहर अध्यक्ष सागर उकंडे विशाल भगत अविनाश घायसुंदर सुरज बुध संदीप मर्दाने किशोर देशमुख अचल बेलसरे रितेश हाडोळे निखील तापडिया शुभम नारे समीर जमदार तसेच शहर कार्यकारणीने केले आहे.
अधिक वाचा : शिवसेनेच्या वतीने तेल्हार्यात शेतकरी पिकविमा केंद्राचे उदघाटन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola