नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या दिल्ली मेडिकल असोसिएशन (DMA) आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. १७ जून रोजी होणाऱ्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्याची घोषणा या संघटनेने केली आहे. या संपाला पाठिंबा देत एम्ससह दिल्लीतील १८ हॉस्पिटलमधील १० हजारांहून अधिक डॉक्टर आज संपावर जाणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत कामावर न येण्याची अटच डॉक्टरांनी ठेवली आहे. पश्चिम बंगालमधील ७०० डॉक्टरांनी आतापर्यंत राजीनामा दिला आहे. यामुळे पश्चिम बंगालमधील आरोग्यव्यवस्था कोलमडली आहे.
कोलकात्यात डॉक्टरांना केलेल्या मारहाणीच्या विरोधात दिल्लीतील प्रसिद्ध १८ हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आजपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. डॉक्टरांच्या या पावित्र्यामुळे दिल्लीतील आरोग्य व्यवस्था कोलमडली जाण्याची शक्यता आहे. कोलकाता येथील नील रत्न सरकार मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरला झालेल्या मारहाणीचे पडसाद देशभरात उमटले आहेत. पश्चिम बंगाल ते दिल्लीपर्यंत डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. डॉक्टरांनी आज पुकारलेल्या संपात १० हजारांहून अधिक डॉक्टर सहभागी होणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
दिल्लीतील एम्स, सफदरजंग हॉस्पिटल, बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, हिंदूराव हॉस्पिटल, बीएमएच दिल्ली, दीनदयाल उपाध्याय हॉस्पिटल, संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटल, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड असोसिएटेड हॉस्पिटल, इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड अलाइड सायन्स, श्री दादा देव मातृ अँड शिशू चिकित्सालय, नॉर्दन रेल्वे सेंट्रल हॉस्पिटल, ईएसआयसी हॉस्पिटल, चाचा नेहरू बाल चिकित्सालय, गुरू तेग बहादूर हॉस्पिटल आणि गुरू गोविंद सिंग हॉस्पिटल या हॉस्पिटलमधील डॉक्टर संपात सहभागी होणार आहेत.
पश्चिम बंगाल, दिल्लीसह जम्मू काश्मीरमधील डॉक्टरांनीही संपात सहभागी होण्याची घोषणा जम्मू-काश्मीर डॉक्टर्स कोऑर्डिनेशन कमिटीने केली आहे. जम्मू-काश्मीरमधील डॉक्टर्स आज सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत दोन तास संपात सहभागी होतील, अशी माहिती संघटनेने दिली आहे. जम्मू-काश्मीर आणि लेह प्रादेशिक हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर सहभागी होणार आहेत.
अधिक वाचा : आरोग्यसेवा कोलमडली; मार्डचे ‘कामबंद’ सुरू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola