तेल्हारा (विशाल नांदोकार) : 28 महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने फेब्रुवारी 2019 मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज तारीख 28 ला घोषित झाला. तालुक्यातील 1844 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकी 1555 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 84 कोणी 32 एवढी आहे सेठ बन्सीधर कनिष्ठ विद्यालय तेल्हारा , नारायणदेवी साह कनिष्ठ महाविद्यालय दानापूर डॉक्टर जगन्नाथ ढोणे कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव बाजार आणि निळकंठ सपकाळ कनिष्ठ महाविद्यालय पाथर्डी या चार कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यावर्षीदेखील निकालात मुलींनी आघाडी घेतल्याचे दिसते.
तेल्हारा तालुक्यातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 130 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर प्रथम श्रेणी 617 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे द्वितीय श्रेणी मध्ये 768 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे तर पास श्रेणी मध्ये40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल पुढील प्रमाणे नूतन कनिष्ठ महाविद्यालय बेलखेड 78.72, सेठ बन्सीधर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तेल्हारा 100, डॉक्टर गोपाळराव खेडकर महाविद्यालया तेल्हारा 69.62, जिल्हा परिषद महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड 78.15, जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय अडगाव 86. 66, सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड 85.91, विवेक वर्धिनी विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय भांबेरी 80, स्वर्गीय बाबासाहेब खोटरे कनिष्ठ महाविद्यालय शिरसोली 95.08, डॉक्टर जगन्नाथ ढोणे यांनी कनिष्ठ महाविद्यालय आडगाव 84.88, नारायणदेवी साह कनिष्ठ महाविद्यालय दानापूर 100, डॉक्टर जगन्नाथ ढोणे कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव बाजार 100, अजहर उर्दू कनिष्ठ महाविद्यालय घोडेगाव 92.30, श्री नाथ कनिष्ठ महाविद्यालय, मनब्दा 90. 47, स्वर्गीय नारायणराव बिहाडे कनिष्ठ महाविद्यालय वरुड 92.85, युनुस अली उर्दू कनिष्ठ महाविद्यालय वडगाव ९७.१२, श्री संत गजानन महाराज कनिष्ठ महाविद्यालय पाथर्डी 95.69, हनी फिया कनिष्ठ महाविद्यालय उमरखेड 75%, श्री अंबिका देवी कनिष्ठ महाविद्यालय सौंदळा 88.88, गुरुकुल ज्ञानपीठ कनिष्ठ महाविद्यालय तेल्हारा 95.15, मौलाना अबुल कलाम कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड ८४.६१, श्री रंगनाथ महाराज कनिष्ठ महाविद्यालय चितलवाडी 91.3, निळकंठ सपकाळ कनिष्ठ महाविद्यालय पाथर्डी 100, आणि डॉक्टर गोपाळराव खेडकर महाविद्यालय व्होकेशनल कोर्स 55.93, उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निकाल पाहिल्यानंतर जल्लोष केला.
अधिक वाचा : महाराष्ट्र स्टुडंट्स लाॅ असोसिएशन (मसला)च्या मागण्यांना यश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola