अकोला(प्रतिनिधी)– पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाकरीता झालेल्या दहाव्या सेमिस्टर चा पहिला पेपर असतांना विद्यार्थांना परीक्षा केंद्रावर अमरावती विद्यापीठाचे 80/20 पॅटर्न असतांना जुन्या अभ्यासक्रमाचा 100 मार्काचा चुकीचा पेपर देण्यात आला होता. या संदर्भात दहाव्या सेमिस्टरच्या विद्यार्थांनी तक्रारी करून सुद्धा दखल न घेतल्यामुळे.महाराष्ट्र स्टुडंट्स लाॅ असोसिएशन (मसला) अमरावती नागपुर विभागाचे अध्यक्ष अंकुश गावंडे यांनी याबाबत राज्यपालांकडे तक्रार केली होती तक्रार करून सुद्धा विद्यापीठाने कुठल्याही प्रकारची या प्रकरणात दखल न घेतल्यामुळे दिनांक 25 मे 2019 रोजी मसला चे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ ईंगळे यांच्या सह आकाश हिवराळे. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अॅड विवेक गावंडे, अद्वेत चव्हाण तसेच विद्यार्थींनी कुलगुरू यांच्या दालनात या सर्व तक्रारीवर कैफियत मांडली असता 29 मे पर्यंत संपुर्ण प्रकरणावर दखल घेवुन आदेश देण्यात येतील असे लेखी पत्र कुलगुरू यांनी दिले असता आज दिनांक 27 मे रोजी कुलगुरू यांनी मागन्या मान्य केल्याबाबद पत्र प्रसिद्ध केले त्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाचे तसेच या लढ्यात सहभागी माझ्या सर्व सहकार्यांचे धन्यवाद..
मान्य झालेल्या मागण्या पुढिल प्रमाणे
1. नविन वेळापत्रक काढुन 10 व्या सेमिस्टर च्या परीक्षा घेण्यात येतील.
2 परीक्षेमध्ये ज्या परीक्षा केंद्रावर चुकीचा पेपर देण्यात आला तेथिल महाविद्यालय संपुर्ण परीक्षेचा खर्च उचलेल अश्या प्रकारे कारवाई केली.
3.विद्यार्थांना अकोला रेल्वे स्टेशन पासुन खंडेलवाल महाविद्यालय दापकी रोड दुर पडत असल्यामुळे यापुळे स्टेशन लगतच शिवाजी महाविद्यालय किंवा जवळील परीक्षा केंद्र देण्यात येतील.
4.पेपर मिळवण्यासाठी उत्तर पत्रिक उच्च दर्जाच्या नसल्याने लीहलेल्या मागील पेजवर विद्यार्थी योग्य लीहु शकत नसल्यामुळे उच्च दर्जाच्या चांगल्या पेजच्या उत्तर पत्रिका देण्यात येतील.
5.परीक्षा हाॅल मध्ये विद्यार्थांना अॅक्वाचे शुद्ध थंड पाणी, फॅन व लाईट ची सोय,स्वच्छ धुड साफ करून दिलेले डेक्स बेंच तसेच कुठल्याही प्रकारे सायकल, मोटर सायकल पार्किंग चे पैसे विद्यार्थांन कडुन आकारले जाणार नाहीत.
6.शासनाच्या परीपत्राकाप्रमाने दुष्काळ ग्रस्त भागातील विद्यार्थींची परीक्षा शुल्क असल्यामुळे परीक्षा शुल्क परत करण्यात येईल.
अंकुश गावंडे
अध्यक्ष -अमरावती- नागपुर
महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिऐशन(मसला)
अधिक वाचा : राज्याचा बारावीचा निकाल जाहीर यंदाही मुलींनी मारली बाजी,कोकणाचा निकाल अव्वल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola