अकोला : 33 कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रयत्न असुन यावर्षी जुलै महिन्यात वृक्ष लागवड करावयाची आहे. यासाठी विविध जिल्हयातील यंत्रणेने खड्डे खोदून 30 मे पुर्वी सदर खड्डे खोदल्याचे माहिती अपलोड करावी असे निर्देश विभागीय आयुक्त पियुषसिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजीत 33 कोटी वृक्षलागवडी आढावा बैठक आज घेण्यात आली त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस, उपवनसंरक्षक श्री. दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड यांनी प्रमुख उपस्थिती होती.
विभागीय आयुक्त पियुषसिंह यांनी विभागवार आढावा घेतांना आयुक्त पुढे म्हणाले की, यावर्षी 33 कोटी वृक्षलागवडी अंतर्गत जिल्हयाला 62 लक्ष वृक्षलागवडीचे उदिष्ट देण्यात आले आहे. सदर उदिष्ट पुर्ण करावे असे सांगुन सर्व विभागानी वृक्षलागवडीसाठी जागा शोधुन खड्डे खोदण्याचे काम येत्या 30 मे पुर्वी पुर्ण करावे. शेताच्या बांधावर जागा शोधुन शेतक-यांना वृक्षलागवडीसाठी प्रवृत्त करून त्याठिकाणी वृक्ष लागवड करावी. तसेच नदी दोन्ही बाजुला वृक्षलागवड करावी असे त्यांनी सांगितले.
वृक्षलागवडीचे कमी उदिष्ट असलेल्या छोटया छोटया विभागाला महसूल व वन विभागांनी जागा उपलब्ध करून दयावी असे सांगुन आयुक्त पुढे म्हणाले की सामाजीक वनीकरण व वनविभागाचे आवश्यक असलेले रोप उपलब्ध करून दयावे असेही ते म्हणाले.
ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या वृक्षलगावडीचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वेळोवेळी उदिष्ट पुर्ण करावे अशा सुचना त्यांनी दिल्यात. ग्रामीण क्षेत्रातील वृक्ष संगोपणाची जबाबदारी ग्रामपंचायतीने तर नगरपालीका क्षेत्रातील जबाबदारी नगर पालीकेने उचलावी अशा सुचना आयुक्त पियुषसिंह यांनी दिल्यात. हरित सेनेसाठी प्रत्येक विभागाने आपल्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी नोंदणी करून प्रत्येकी 100 झाडे लावण्याची प्रयत्न करावे अशा सुचना आयुक्त पियुषसिंह यांनी केल्यात.
कन्या बाल समृध्दी योजनेअंतर्गत शेतक-यांच्या कुटूंबात कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर त्यांना वृक्षलागवडीसाठी 10 वृक्ष मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामीण स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी व शहरी स्तरावर नागरपालीकेने यादी तयार करून सामाजीक वनीकरण विभागाला देण्यात यावी अशा सुचना आयुक्त पियुषसिंह यांनी दिल्यात.
ज्या विभागाने खड्डे खोदली आहेत, त्या खड्याची तपासणी करत ते योग्य असल्याची माहिती वनविभागाने 30 मे पुर्वी जिल्हाधिकारी यांना देण्यात यावी अशा सुचना त्यांनी वनविभागाला दिल्यात.
अकोला जिल्हयाला देण्यात आलेले वृक्षलागवडीचे उदिष्ट पुर्ण करण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिली.
या बैठकीला कृषि विभाग, सामाजीक वनीकरण आदिवासी विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे, एमआयडीसी, रेशीम विभागसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तत्पुर्वी विभागीय आयुक्त पियुषसिंह यांनी शासकीय गोडावून खदान येथील मतमोजणी या ठिकाणाला भेट देवून मत मोजणीच्या प्रक्रियेचा तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, तहसिलदार विजय लोखंडे, नायब तहसिलदार सतिश काळे हे होते.
अधिक वाचा : अकोल्यातील २६ वर्षीय राष्ट्रीय कुस्तीपटू तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, जिल्हा युवकांच्या आत्महत्येने अवाक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola