लाहोर : पाकिस्तानमधील लाहोरमध्ये सुफी दर्ग्यासमोर झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात तीन पोलिसांसह एकाचा मृत्यू झाला. रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये पाकिस्तान बॉम्बस्फोटांनी हादरले. या स्फोटात १५ हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दाता दरबार दर्ग्यात महिलांसाठी असलेल्या प्रवेशद्वाराजवळ हा स्फोट झाला. दक्षिण आशियातील हा सर्वात मोठा सूफी दर्गा आहे. याआधी २०१० मध्ये या दर्ग्याला लक्ष्य करण्यात आले होते. त्यावेळी बॉम्बस्फोटात ४० लोकांचा मृत्यू झाला होता. या दर्ग्याजवळ मोठा बंदोबस्त असतो. सुरक्षा दलाच्या वाहनांना लक्ष्य करण्यासाठीच आत्मघाती हल्ला घडवण्यात आल्याची शक्यता पोलीस अधिकारी काशिफ यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा : धक्कादायक ; अकोल्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात व्यावसायिकाचा खून
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola