मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा सण मंगळवारी साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी देवाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये गर्दी केली असून मंदिर परिसरही सजवण्यात आला आहे. आजच्या दिवशी हंगामातील पहिल्या आंब्यांचा महानैवेद्य देवाला दाखवला जातो. त्यामुळे ही आंब्यांची आरास मंदिर, गाभा-यात विशेष आकर्षण ठरत आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने मंदिरात पिवळ्या झेंडूंच्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल आणि रुक्मीणीच्या गाभा-यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विठ्ठलाला या हंगामातील पहिल्या आंब्याचा रस महानैवैद्यात दिला जातो. तसेच पुण्यातील दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला.
दादरच्या श्री उद्यान गणेशाला २१०० आंब्यांची आरास करण्यात आली. विशेष म्हणजे हा नैवेद्य बालिकाश्रम, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथे वाटला जाणार आहे. ही आंब्यांची आरास मंदिराचे विशेष आकर्षण ठरत असून ही सजावट पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. नाशिकची ग्रामदेवता असलेल्या कालिका मातेच्या मंदिरातही आंब्यांची आरास करण्यात आली आहे. यामुळे कालिका देवीचे सुंदर रूप बघायला मिळत आहे.
अधिक वाचा : तेलाऱ्यातील दहा वर्षीय मंदार ठोंबरे चे दोन हजार बीज संकलन व रोपण करून वृक्षसंवर्धनाचे कार्य
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola