नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाने आज जैश – ए – मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. याची माहिती भारताचे संयुक्त राष्ट्रातील अम्बॅसिटर सईद अकबरुद्दीन यांनी याची माहिती दिली. पुलवामा येथील सीआरफीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने या हल्ल्याचा सुत्रधार असलेल्या मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात सादर केला होता. आज तो संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून मान्य करण्यात आला आहे.
जैश – ए – मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने अनेक वेळा संयुक्त राष्ट्र संघात प्रस्ताव सादर केले होते. पण, भारताचा शेजारी चीनने त्यामध्ये कायम आडवा पाय घातला होता. पण, पुलवमा हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकला बालाकोटमध्ये दिलेले प्रत्युत्तर यामध्ये सर्वच देशांनी भारताला दिलेला पाठिंबा यामुळे चीन एकाकी पडला होता. या सर्व दबावामुळे चीनने या प्रस्तावातील तांत्रिक अडचण दूर करत मसूद अजहरला आंतराराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा मार्ग मोकळा केला.
गेल्या १० वर्षापासून भारत मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रयत्न करत होता. पण, त्यामध्ये चीन व्हिटो वापरून सारखा खोडा घालत होता. पण, गेल्या आठवड्यातच दबावात असलेल्या चीनने मसूद अजहर प्रकरणी सकारात्मक असल्याचे संकेत दिले होते. भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले हे चीनच्या दौऱ्यावर गेले होते त्यांनी चीनला जैशच्या दहशतवादी कारवायांचे अधिक पुरावे दिले होते. पाकिस्तानचा लष्कर ए तैयब्बाचा म्होरक्या हाफिस सईदलाही संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते.
अधिक वाचा : अकोला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola