अकोला (प्रतिनिधी)- अकोला जिल्हा परिषदेच्या गटांची आरक्षण सोडत प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात काल राबविण्यात आली. तर पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडतही संबंधित तहसील कार्यालयात काढण्यात आली. विशेष म्हणजे, यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या ५३ गट आणि पंचायत समितीच्या १०६ गणांचे आरक्षण जाहीर झाले.
अकोला, धुळे, नंदुरबार व वाशिम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर नागपूर खंडपीठाने आरक्षणासंदर्भात झालेल्या घोळ्याबाबत सुनावणीस स्थगिती दिली आहे. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात असलेली कारवाई पूर्ण करून निवडणूक न घेण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत काल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निर्देशांक नियोजन भवनात काढण्यात आली. यायासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला निवडणुकीत उभे राहणाऱ्या इच्छुकांचीही उपस्थिती होती.
अकोला जिल्हा परिषदेच्या ५३ गटांची आरक्षण सोडत काढण्यास सुरुवात झाली. २००३ आणि २००८ या निवडणुकीतील आरक्षण संदर्भातील निघालेले प्रवर्ग वगळून लोकसंख्येनुसार आरक्षण प्रवर्गनिहाय काढण्यात आले. हाच नियम पंचायत समिती स्तरावरही लावण्यात आला. ५३ जागांऐवजी २७ जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर पंचायत समिती स्तरावर ही महिलांसाठी सर्वच प्रवर्गात राखीव जागा आरक्षणानुसार ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार सोडतही काढण्यात आली.
अधिक वाचा : परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नाहक त्रास, भाजयुमो व शिवसेनेने महाविद्यालय प्रशासनाला धरले धारेवर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola