पातूर(सुनिल गाडगे): लोकशाही सुदृढ व बळकट व्हावी, मतदानाविषयी समाजामध्ये असलेली मरगळ दूर होऊन मतदानाचा टक्का वाढवा हा दृष्टीकोन समोर ठेऊन एज्युविला पब्लिक स्कूल पातूर च्या विद्यार्थ्यांनी जनजागृती मोहिमेचा आज आरंभ केला.
तहसीलदारश्री दिपक बाजड तथा स्वीप नोडल अधिकारी नायब तहसीलदार अर्चना भगत यांच्या मार्गदर्शनात सैय्यद ऐसानोद्दीन नायब तहसीलदार आणि गटशिक्षणाधिकारी दिपमाला भटकर यांच्या नेतृत्वात पोस्ट ऑफिसर प्रवीण मुळे यांच्या प्रमुख उपस्तिथीत एज्युविला पब्लिक स्कूल पातूरच्या मुख्याध्यापिका विद्या निलेश गाडगे यांच्या संकल्पनेतून निलेश गाडगे लिखित व दिग्दर्शित “चलो आज कुछ अच्छा करते है” मतदार जागृतीपर पथनाट्याचे सादरीकरनाचा आरंभ पोस्ट ऑफिस चौकातून व नवीन बस स्टँड चौकातून झाला. ललहानग्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून मतदारांना त्यांच्या मताचे मोल व महत्व सात्विक अभिनयातून पटवून दिले. उपस्थित जनसमुदयानेही विद्यार्थ्यांना भरभरून दाद देत त्यांचे कौतुक केले. येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व स्थरातील मतदारांनी आपले बहुमुल्य मत देऊन आपला मतदानाचा हक्क आपले कर्तव्य बाजावावे यासाठी यश महूलीकर, अनुश्री गाडगे, स्वरा ताले, आदित्य भूतकर, नेत्रा राऊत, संजीवनी गाडगे, उज्वल हिंगणे, आरती तायडे, समीक्षा खिल्लारे, तन्वी गणेशे, समृद्धी गाडगे, श्रुस्टी आयस्कर, ऋतुजा राठोड, प्रेरणा जुमडे, प्रसाद उगले, आयुषी पाठक, अर्जुन वानखडे, मयुरी उगले, श्रद्धा तायडे, ओम राऊत, गौरी खंडारे, वैष्णवी जाधव, दिपेश राठोड, हि सर्व एज्युविला पब्लिक स्कूलची चमू पातूर बाळापूर तालुक्यात मतदार जागृती अभियान राबवणार आहे.
उपरोक्त कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी शाळेचे शिक्षक शुभम काकड, सविता ठाकरे, प्रवीण पाचपोर, भारत फुलारी, तहसील कार्यालयाचे श्री घुले पोस्ट ऑफिसचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले पोलीस विभागाने यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
अधिक वाचा : विनापरवानगी सभा घेतल्याने कॉग्रेस विरुध्द आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola