अकोला (प्रतिनिधी) :- अकोट फैल येथील आपातापा चौकात विनापरवानगी सभा घेतल्या प्रकरणी कॉग्रेस पक्षा विरुध्द आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला पश्चिमचे फिरते पथक यांनी अकोट फैल पोलीस स्टेशनला रितसर तक्रार नोंदवीलेली आहे.
अकोला पश्चिमचे फिरते पथक क्रं. 3 चे प्रमुख जितेंद्र रामभाऊ गायकवाड हे दिनांक 4 एप्रिल रोजी गस्तीवर असतांना त्यांना आपातापा चौक येथे कॉग्रेस पक्षाची विनापरवानगीने सभा सुरु असल्याची माहिती मिळाली त्यांनी सदरच्या ठिकाणी भेट देवून सभेच्या परवानगी बाबत माहिती विचारली. सभेबाबत आवश्यक असणाऱ्या कागदपत्रे व परवानगी सादर करण्यास आयोजक रवि श्रीराम शिंदे असमर्थ ठरले. त्यानंतर पथकाने सभेचे व्हीडीओ रेकॉर्डींग केले. ही सभा आयोजकाने निवडणुक आयोगाची कोणतीही पुर्व परवानगी घेतलेली नसतांना तसेच अंदाजे 125 नागरीक जमा केल्याने आचारसंहितेचा भंग केला आहे त्यानुसार अकोट फैल पोलीस स्टेशनमध्ये आयोजकांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 2