तेल्हारा (रवी राऊत)- स्थानिक जय भवानी चौकातिल एका बँक ग्राहकाला क्रेडिट कार्ड, आधार कार्ड नंबर व जन्म तारीख फोनवर एका व्यक्तीला देने चांगलेच महागात पडले असून त्याच्या बँक खात्यामधून 77485 रुपये परस्पर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला असुन या बाबत तेल्हारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्राप्त माहिती नुसार शिवदास गजानन लासुरकार यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा तेल्हारा येथे बचत खाते आहे. त्यांना 4 ते 5 महिन्यांपूर्वी गौरव पांगळे या व्यक्तींने क्रेडिट कार्ड काढण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर लासुरकार यांनी दि. 12-2-2019 ला पांगडे यांना फोन करून मला क्रेडिट कार्ड नको आहे ते बंद करण्यात यावे असे सांगितले. त्यानंतर लासुरकार यांना दि 14-2-2019 ला एक फोन आला व म्हटले की मी स्टेट बँक मधून बोलत आहे तुमचे कार्ड बंद करत आहे तुमचा आधार कार्ड नंबर व जन्म तारीख मागितली. त्यानंतर नंबर मेसेज करून पाठविण्यात आला त्यानंतर लासुरकार यांना फोनवर स्टेट बँकचा मेसेज आला की तुमच्या सदर खात्यातून 77485 रुपये काढण्यात आले आहे त बँक खात्याच्या स्टेटमेंट मध्ये सदर रक्कम काढण्यात आल्याचे दिसून आले. असता लासुरकार यांनी दि 25-3-2019 ला तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली असता त्यांनी सायबर क्राईम अकोला कार्यालयात पाठविले असता तेथे तेथील अधिकाऱ्यांनि तपशील वार सदर फोन नंबर सहित रिपोर्ट देण्यास सांगितले म्हणून लासुरकार यांनी पुन्हा तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन दि 27-3-2019 ला आपली तक्रार दाखल करून सदर व्यक्तीने माझ्या खात्यातील परस्पर 77485 रुपये काढून मला फसविले आहे, मी एक गरीब शेतकरी आहे, माझ्यावर झालेला अन्याय दूर करून दोषींना सजा देण्यात यावी, सदर व्यक्तीची मोबाईल रिकारडींग सुध्दा माझ्याकडे आहे, अशी तक्रार शिवदास लासुरकार यांनी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. यावर पोलीस प्रशासन काय कार्यवाही करते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : वीज बिलाचा भरणा करताना हस्तलिखित पावत्या स्वीकारू नये संगणकीय पावत्याच स्वीकाराव्यात – महावितरणचे आवाहन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola