अकोला (प्रतिनिधी) : राज्यभरात उन्हाळ्याच्या तडाख्यासोबतच यंदा वीज दरवाढही जोरदार होणार आहे. वीजदरात 6% वाढ होणार असून हे नवे दर 1 एप्रिल 2019 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना वीजदरवाढीचा फटका बसणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने सप्टेंबर 2018 मध्ये दिलेल्या आदेशानुसार राज्यभरात वीज दरवाढ होणार आहे.सप्टेंबर 2018 मध्ये राज्य वीज आयोगाने राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या नव्या वीज दरांना मान्यता दिली होती. त्यामुळे महावितरण, अदानी, टाटा पॉवर यांच्या वीजदरात वाढ झाली होती. 1 एप्रिलला तुम्ही Fool’s होणार नाही तर खरचं ‘या’ गोष्टी महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार
महावितरण वीज दर:
दरमहा 100 युनिट वापर असलेल्या ग्राहकांसाठी वीजदर 5.30 रुपये प्रति युनिट असून यात आता 16 पैशांनी वाढ होणार असून ग्राहकांना प्रति युनिटसाठी 5.46 रुपये मोजावे लागतील.तर 101 ते 300 युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांसाठी वीजदर 15 पैशांनी वाढणार आहे.त्याच पर स्थिर आकारात 10 रुपयांनी वाढ होऊन तो 80 वरुन 90 रुपये होणार आहे.
अधिक वाचा : महावितरण च्या ग्राहकांना मीटर रिडींग घेण्याची पूर्वसूचना एसएमएसद्वारे मिळणार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1