अकोला (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालय हिंगणा रोड अकोला येथे जिल्हाध्यक्ष श्री. संग्रामभैय्या गावंडे यांनी लोकसभा निवडणूक संबंधि तातडीची बैठक बोलावली होती. नियोजन मिटींगला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष अधिकृत उमेदवार श्री. हिदायत पटेल यांनी उपस्थित राहून सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी मांडून जिल्हा राष्ट्रवादीला सज्ज राहण्याच्या सूचना केल्या तर जेष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष कोरपे यांनी मार्गदर्शन केले. तसेच तुकारामभाऊ बिडकर, आशाताई मिरगे, सय्यद युसूफ अली, राजू बोचे यांनी मार्गदर्शन व सुचना केल्या. जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी निवडणूक नियोजन मनोगते मांडली. मिटींगला जेष्ठ नेते नानासाहेब हिंगणकर, गजानन इंगळे, दिलीप आसरे, शाम अवस्थी, सदाभाऊ शेळके, जावेद जकेरीया, आदील अन्सारी, पंकज गावंडे, अजीजभाई, फजलु पहेलवान, दीपक धनोकर सह फ्रँटल्स/सेल जिल्हाध्यक्ष, ऍड महेश सरप, डॉ.विजयकुमार वाघ, अविनाश चव्हाण, जयाताई जुनारे, राजुसिंग राठोड, ज्ञानेश्वर माळी, भाऊराव सुरडकर, आदिल अन्सारी, रवी राठी, निजांमभाई, श्रीकृष्ण बोळे, शंकर कंकाळ सह तालुका अध्यक्ष कैलास गोंडचवर, देवानंद मर्दाने, प्रदीप ढोले, दिलीप पिवाल, जगदीश मारोटकर, राम कोरडे, दीपक धनोकर, अजय पागृत, शिवाजी म्हैसने, सौ.जुणारे, डॉ.गणेश महल्ले, श्रावण रणबावले, राजेश मंगळे, केशव खेडकर, प्रेम गावंडे, निखिल ठाकरे, अविनाश ठाकरे, विनोद आंबूस्कर, संतोष अवचार, राजेश राऊत, तफफसूल हुसेन, राजेंद्र देशमुख, सुनील अंधारे यांचेसह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्र संचलन जिल्हा महासचिव डॉ.विजयकुमार वाघ यांनी तर आभार प्रदर्शन ऍड.महेश सरप यांनी केले. ह्यावेळी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच हा सूर सर्वत्र जाणवला.
अधिक वाचा : हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अकोल्यातुन युतीकडून संजय धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola