मुंबई : ग्राहकांची गैरसोय होवू नये, मीटर रिडींग आणि वीजबिलात अचुकता व पारदर्शकता राहावी यासाठी महावितरण च्या ग्राहकांना आता मीटरचे रिडींग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे याची पूर्वसूचना ग्राहकांच्या महावितरणकडील नोंदणीकृत मोबाईलवर एक दिवस अगोदर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे.
महावितरणने ऑगस्ट 2016 पासून मोबाईल ॲपव्दारे मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात मोठया प्रमाणात अचूकताही आली आहे. आता वीजमीटर रिडींग प्रक्रियेत ग्राहकांना आपले मीटर रिडींग तत्काळ तपासता यावे म्हणून महावितरणकडे नोंदणी केलेल्या अधिकृत मोबाईलवर ग्राहकांना मीटर रिडींगच्या पूवसूचनेचा एसएमएस देण्यात येणार असून यात सकाळी 8 ते 10, 10 ते 12 दुपारी 12 ते 3 आणि 3 ते 5 या दरम्यान कोणत्या वेळेत रिडींग घेतले जाणार आहे याची माहिती दिली जाणार आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार असून रिडींग घेण्याच्या वेळेस ग्राहकांना उपस्थित राहून योग्य रीडींग घेतले जात आहे अथवा नाही याची खातरजमा करता येणे शक्य होणार आहे.
महावितरणने 1 मार्च 2019 पासून राज्यातील गणेशखिंड, रास्तापेठ, कल्याण-I, नागपूर शहर मंडल, वाशी व ठाणे (मुंब्रा व्यतिरिक्त) अशा सहा मंडलात ग्राहकांना मीटर रिडींगची पूर्वसूचना देण्याची प्रक्रिया प्रायोगिक तत्वावर सुरु केली आहे.
महावितरणकडून ग्राहकांसाठी राबविण्यात येत असलेल्या इतरही विविध उपयुक्त उपक्रमांची माहिती ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर दिली जाते. त्यामुळे ज्या ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली नसेल अशा ग्राहकांनी महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी. आपल्या नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MREG (स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24×7 सुरु असणार्याा कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. तसेच www.mahadiscom.in संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल ॲपद्वारेदेखील मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.
अधिक वाचा : रंगोत्सवाच्या सणात विज अपघाताचे गालबोट लागू नये-महावितरण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1