अकोला (प्रतिनिधी) : होळी व धुळवड उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये, यासाठी होळी पेटविताना व रंग खेळताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरण तर्फे करण्यात येत आहे.
होळी पेटविताना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहीत्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या, अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जीवंत तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या हया भुमिगत असल्याने यासंदभार्तील माहिती घेऊन त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी, जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भुमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील. होळी पेटवितांना शक्यतो मोकळया जागेचा वापर करा, ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणतांना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या, विजेचे अपघात हे प्राणघातक असल्याने एक चूकही प्राणांकीत अपघातास कारणीभूत ठरू शकते.
त्याचप्रमाणे रंगोत्सव साजरा करतांना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यापर्यंत उडणार नाही याची काळजी घ्या. रंग भरलेले फुगे फेकतांना ते वीजेचे खांब आणि वीजवाहिन्या यांना लागणार नाही याची खबरदारी घ्या. विज वितरण यंत्रणेचे रोहीत्रे व तत्सम वितरण उपकरणे बसविलेल्या जागेपासून लांब अंतरावरच रंग खेळा. रंग खेळतांना ओल्याचिंब शरीराने वीज यंत्रणेला स्पर्श झाल्यास अपघाताचा संभाव्य धोका असल्याने वीजेचा खांबांना स्पर्श करू नका. वीजेच्या खांबाभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची खबरदारी घ्या. घरात होळी खेळतांना वीज मिटर, वीजेचे प्लग, वीजतारा आणि वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करा, ओल्या हाताने वीजेच्या उपकरणांना स्पर्श करू नका. होळी व रंगोत्सव हा सण हा आनंदाचा असल्याने महावितरणच्या आवाहनाप्रमाणे खबरदारी घेऊन आनंद व्दिगुणित करण्याचे आवाहन महावितरणच्या अकोला परिमंडलाकडून करण्यात आले आहे.
हे लक्षात ठेवा
- वीज वितरण यंत्रणेपासून लांब अंतरावर व मोकळ्या जागेतच होळी पेटवा.
- होळी आणताना तीचा स्पर्श वीज वाहिन्यांना होऊ नये.
- वीज वाहिन्या, वितरण रोहीत्रांवर पाणी फेकू नका.
- ओल्या शरीराने वीज उपकरणांना स्पर्श करू नका.
- वीज खांबासभोवती पाण्याचा निचरा करु नका.
अधिक वाचा : अकोल्यात विविधरंगी माठ विक्रीसाठी दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola