• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अवर अकोला न्युज ब्रेकिंग- तेल्हारा हत्याकांड प्रकरणी साथ देणाऱ्या पत्नीनेच केला पतीचा घात

Editor by Editor
May 30, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
तेल्हारा हत्याकांड प्रकरणी चोवीस तासात होणार चित्र स्पष्ट !
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

* अखेर अवर अकोला न्युज चे भाकीत खरे ठरले

*आरोपीचा पतीने आत्महत्या केल्याचा बनाव फसला

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

*तेल्हारा पोलिसांनी ४८ तासात केली आरोपीला अटक

तेल्हारा(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरात काल सकाळी ५० वर्षीय इसमाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली होती.यानंतर तेल्हारा पोलिसांनी तपास चक्रे फिरवली असता जीवनभर साथ देणाऱ्या पत्नीने पतीचा घात केल्याची बाब समोर आली याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांडुन मिळालेल्या माहितीनुसार तेल्हारा शहरातील संभाजी चौक येथील रहिवासी रमेश ओंकार हागे ५० यांचा मृतदेह काल सकाळी त्यांच्या घरासमोरील झोपडीत रक्ताच्या थारोड्यात तसेच जळलेला अवस्थेत आढळून आला होता.यावेळी हत्या झाल्याची बाब शहरात वाऱ्या सारखी पसरल्याने घटनास्थळी एकच खळबळ माजली होती.यावेळी तेल्हारा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ठाणेदार विकास देवरे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अकोला येथील श्वान पथक,ठसे तज्ञ यांना पाचारण करून तपासचक्रे फिरवली.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे,स्थानिक गुन्हे शाखेचे कैलास नागरे यांनी यांनी घटनास्थळी पाहणी करून चॉकशी करण्यास सुरुवात केली. यामध्ये बऱ्याच जणांना संशयाच्या खाली विचारपूस करण्यात आली होती.यावेळी विशेष म्हणजे आरोपी पत्नीने असा काही बनाव केला होता की आरोपीची मध्यरात्री हत्या करून मृतदेह घरासमोरील झोपडीत आणून टाकला व मृतकाच्या जवळ एक चिठी लिहून टाकली व असे दर्शवले की माझ्या पतीने आत्महत्या केली.मात्र घटनास्थळावरील पुरावे आणि एकंदरीत तेथील चित्र काही वेगळेच असल्याने पोलिसांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे स्पष्ट केले होते. आरोपी पत्नी मंगला रमेश हागे हिने घटनेच्या रात्री सुमारे १.३० वाजेच्या दरम्यान पतीच्या डोक्यात मुसळ मारून जखमी केले त्यानंतर गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आरोपी पत्नी एवढ्यावरच न थांबता तिने पतीला घरातच जाळण्याचा पर्यन्त सुद्धा केला मात्र घरात चांगलाच पेट मृतदेहाने घेतल्याने तीने मृतदेह पाण्याने विजवून त्याला फरफटत घराच्या बाहेर आणून झोपडीत आणून टाकले.सकाळी पतीला कोणीतरी मारून घरासमोर आणून टाकल्याचा बनाव करून पोलिसांची प्रथम दिशाभूल केली मात्र तेल्हारा पोलीस,श्वान पथक,ठसे तज्ञ,गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून सदर हत्याकांड घरातच घडल्याचे समजले.हत्याकांड घडले तेव्हा मृतकाचा मुलगा हा लग्नात गेलेला होता तर मुलगी आणि आरोपी पत्नी ही शेजारच्या घरी झोपायला गेली होती मात्र आरोपी पत्नीने मोठ्या चलाखीने पतीचा अर्ध्या रात्री काटा काढला.

आज सकाळी आरोपी मंगला हागे हिला तेल्हारा पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता पाहिले उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी आपला पोलिसिंग दाखवताच मीच हत्या केल्याचे कबूल केले.याप्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यात कलम ३०२,२०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये इतर कलमे वाढण्याची शक्यता आहे.तर तेल्हारा पोलीस या हत्याकांडात अजून कोणी सहभागी होते का याचा तपास करीत आहे.सदर हत्याकांडाचा तपास तेल्हारा पोलिसांनी ४८ तासात लावल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

आरोपी मंगला रमेश हागे हिने आपल्या चौकशीत हत्या केल्याचे कबूल करून सदर हत्या ही पतीच्या दारूच्या त्रासापायी पतीचा काटा काढल्याचे पोलिसांना सांगितले

याप्रकरणी तेल्हारा पोलीसांची तपासाची गती बघता अवर अकोला न्युज ने आज दुपारीच असे भाकीत वर्तवले होते की येत्या चोवीस तासात आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यात येईल ते भाकीत खरे ठरले.

*ताज्या घडामोडीसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या*

तेल्हारा हत्याकांड प्रकरणी चोवीस तासात होणार चित्र स्पष्ट !

*हाक तुमची ?? साथ आमची*

Previous Post

आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Next Post

अकोट पोलिसांनी २२ हजाराचा प्रतिबंधित गुटखा केला जप्त

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
अकोला

अकोट पोलिसांनी २२ हजाराचा प्रतिबंधित गुटखा केला जप्त

छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन निवडून आलेल्या सत्ताधाऱ्यांना पडला छत्रपतींचा विसर – शिवप्रेमींचे न.प.ला निवेदन

बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत उद्या अकोटात बारी समाजाचा भव्य मेळावा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.