अकोला(प्रतिनिधी)- कापूस शेतकºयांचे नगदी पीक आहे. शेतकºयांचा वर्षभराचा आर्थिक बजेट कापूस या एकमेव पिकांवर अवलंबून असतो. कापूस पिकविण्यासाठी येणारा खर्च मोठ्या प्रमाणात आहे. त्या तुलनेत कापसाला बाजारपेठेत मिळणारा दर तोकडा आहे. फेब्रुवारी महिना संपायला आला तरी कापसाचे दर अजूनही वाढले नसल्याने शेतकºयांनी कापूस दरवाढीच्या प्रतीक्षेत घरीच ठेवला आहे. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.
विदर्भ प्रांत कापूस पिकासाठी अग्रेसर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते, दरवर्षी शेतकरी कापसावर खूप मोठा खर्च करतात. त्या तुलनेत उत्पादन होणे आवश्यक आहे. मात्र निसर्गाचा लहरीपणा दिवसेंदिवस वाढल्याने कोरडवाहू शेतीला मोठ्या प्रमाणात अवकळा आली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या उत्पादनात मोठी घट होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकºयांनी उसनवारी व कर्ज काढून शेती केली. मात्र यावर्षी शेतकºयांच्या उत्पादनाचा टक्का घसरला आहे. यंदा उत्पादन घटल्याने शेतकºयांना शेती करणे न परवडणारे झाले आहे. शेती नेहमीच संकटात सापडत असल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. शेती पिकत नसल्याने शेतीला मोठ्या प्रमाणात अवकळा आली आहे.
अनेक शेतकºयांनी गरजेपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री केली. खरे तर कमी दरात शेतमाल विकणे परवडत नाही. परंतु शेतकºयांचा नाईलाज असतो. सुरुवातीला कापसाचे दर चांगले होते. पाच हजार ८०० रुपयापर्यंत कापूस विकला जायचा. मात्र अचानक कापसाचे दर तब्बल ५०० रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पाच हजार ३०० रुपयापासून उत्पादनावर झालेला खर्च बघता हा दर शेतकºयांना परवडणारा नाही. कापसाचे भाव वाढेल, या आशेवर कापूस घरीच आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola