• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत सहभागी होण्यासाठी शासनाने रक्कम केली कमी,विजजोडणी असणारे शेतकरी करू शकतात अर्ज 

Editor by Editor
May 30, 2020
in Featured, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
81 1
1
शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत सहभागी होण्यासाठी शासनाने रक्कम केली कमी,विजजोडणी असणारे शेतकरी करू शकतात अर्ज 
12
SHARES
586
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई दि.१४ फेब्रु(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या हिस्याची भरावी लागणारी रक्कम आता कमी करण्यात आली आहे. तसेच महावितरण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत वीजजोडणी घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेत ऑनलाईन अर्ज करून सहभागी होता येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कृषिपंपांसाठी वीजजोडणी घेतली नाही किंवा वीजजोडणीचे पैसे भरून त्यांची वीजजोडणी प्रलंबित आहे अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यभरातील सुमारे ६४ हजार ९३८ शेतकऱ्यांचे अर्ज मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी प्राप्त झाले असून त्यापैकी १७ हजार ०१६ शेतकऱ्यांना कोटेशनही देण्यात आले आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

महावितरण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ज्या शेतकऱ्यांना केबलद्वारे वीजपुवठा देण्यात आला होता अशा शेतकऱ्यांची पायाभूत यंत्रणा उभारून कायमस्वरुपी वीजपुरवठा देण्याबाबत मागणी आल्याने त्यांनाही मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत ऑनलाईन अर्ज करून सहभागी करून घेण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.

शासनाने मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची मान्यता दिली. त्यानंतर या निविदेद्वारे निश्चित झालेली कृषिपंपाची किंमत ३ एचपी डीसीसाठी १ लाख ६५ हजार ५९४ व ५ एचपी डीसीसाठी २ लाख ४७ हजार १०६ एवढी आहे. ही रक्कम पूर्वीच्या तुलनेत कमी असल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. पूर्वी ३ एचपी डीसीपंपासाठी आधारभूत किंमत २ लाख ५५ हजार व ५ एचपी डीसी पंपासाठी ३ लाख ८५ हजार होती.

सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पूर्वी ३ एचपीसाठी २५ हजार ५०० (दहा टक्के) तर अनुसूचित जाती / जमाती गटातील लाभार्थ्यांना १२ हजार ७२५ एवढी रक्कम भरावी लागत होती. ती रक्कम आता अनुक्रमे १६ हजार ५६० व ८ हजार २८० एवढी भरावी लागणार आहे. तर ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पूर्वी ३८ हजार ५०० (दहा टक्के) तर अनुसूचित जाती / जमाती गटातील लाभार्थ्यांना १९ हजार २५० एवढी रक्कम भरावी लागत होती ती रक्कम आता अनुक्रमे २४ हजार ७१० व १२ हजार ३५५ एवढी रक्कम भरावी लागणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी सुमारे ५३३ शेतकऱ्यांनी पैसे भरले असून लवकरच या शेतकऱ्यांना सौर कृषिपंपाद्वारे वीजजोडणी देण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी www.mahadiscom.in/solar या महावितरणच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Previous Post

दानापुर येथील शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

Next Post

दुष्काळी १५१ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १ हजार ४५४ कोटींच्या दुसरा टप्प्यातील निधीचे वितरण

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शेतकरी

दुष्काळी १५१ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १ हजार ४५४ कोटींच्या दुसरा टप्प्यातील निधीचे वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस : बँकवाले ऐकत नसतील तर मी त्यांना बघतो

Comments 1

  1. Pingback: दुष्काळी १५१ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १ हजार ४५४ कोटींच्या दुसरा टप्प्यातील निधीचे वितरण - Our Ako

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.