तेल्हारा (प्रतिनिधी): राष्ट्रीय आयुष अभियान व ब्रह्मकुमारी वैद्यकीय प्रभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक ब्रह्मकुमारी केंद्र गजानननगर, साई मंदिर रोड, तेल्हारा येथे दिनांक २०-२-२०१९ रोजी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मानसिक स्वास्थ व राजयोग मेडिटेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांचे मानसिक बळ वाढवणे, ताण तणावाच्या प्रसंगात शांत राहण्याची सवय निर्माण करणे व त्यांची नियमित काम करण्याची क्षमता वाढविण्याच्या अनुषंगाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ. निलेश अंबरते, वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र पंचगव्हाण यांनी केले. ब्रह्मकुमारी संस्थेच्या संक्षिप्त परिचय बि. के. शाम बोडखे यांनी दिला. त्यानंतर ब्रह्मकुमारीज शाखा तेल्हारा च्या संचालिका बि. के. विजयभाई साळके, अकोला यांनी राजयोगाचे मानसिक स्वास्थावरील फायदे याबद्दल विविध उदाहरणांच्या आधारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच राजयोग ध्यान प्रत्यक्षक्रिया व अनुभूती बि. के. वैशाली दीदी यांचे द्वारे करण्यात आली. डॉ. ऑनरुद्ध वेते वैद्यकीय, अधिकारी प्रा. आ. केंद्र दानापूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व श्री वसंत ईखार आरोग्य सहाय्यक हिवरखेड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमात तेल्हारा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी बहुसंखेने उपस्थित होते. मान्यवरांना ईश्वरीय भेट व प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola