तेल्ह्रारा (प्रतिनिधी) – राष्ट्रीय आयुष अभिमान व ब्रह्मकुमारी वैद्यकीय प्रभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक ब्रह्मकुमारीज केंद्र गजानन नगर, साई मंदिर रोड, तेल्हारा येथे आज मानसिक स्वास्थ व राजयोग मेडिटेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांचे मानसिक बळ वाढवणे, ताण तणावाच्या प्रसंगात शांत राहण्याची सवय निर्माण करणे व त्यांची नियमित काम करण्याची क्षमता वाढविण्याच्या अनुषंगाने ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राजकीय सर्व तालुक्यात ब्रह्मकुमारी वैद्यकीय प्रभाग यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यशाळेत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच अन्य शासकीय अधिकारी कर्मचारी आदींना प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा दुपारी १.३० ते ३.३० या कालावधीत घेतल्या जाणार आहे. कार्यशाळेत राज्य धान्य म्हणजे काय ? व त्याचे मानसिक स्वास्थ वरील फायदे यावर व्याख्यान राजयोग, धान्य प्रत्यक्षक्रिया, शंका समाधान, प्रश्न उत्तरे आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे, तरी या कार्यशाळेच्या सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती.
अधिक वाचा : अकोटात वसंत पंचमी निमित्य बालसंस्कार कार्यशाळा संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola