तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा शहरातून आज दिनांक 21 फेब्रुवारी गुरुवार रोजी राधाकृष्णजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य दिव्य प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये चारशे भाविक सहभाग घेतला होता.
दोन वर्षापूर्वी तेल्हारा शहरात झालेल्या भागवत कथे दरम्यान महाराजांनी दैनंदिन प्रभात फेरी शहरातून निघावी अशी इच्छा सद विचार परिवारा जवळ प्रगट केली होती. त्यानुसार गत दोन वर्षात तेल्हारा शहरात अखंड प्रभात फेरी काढल्या जात आहे तुमची प्रभात फेरी अखंडपणे सुरू राहिल्यास मी एक दिवस प्रभात फेरीत सहभाग घेण्याचा मनोदय देखील त्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी पूजनीय राधाकृष्ण जी महाराज यांनी पहाटे सहा वाजता तेल्हारा शहरातून निघालेल्या प्रभात फेरीत सहभाग घेतल्यामुळे तेल्हारा शहरवासीयां चा आनंद द्विगुणित केला महाराजांचे प्रभात फेरीत आगमन होत असल्याचे शहरातील भक्तांना समजताच त्यांनी त्या फेरीत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. महिलांनी आपापल्या घरासमोर रांगोळ्या दिव्याची व फुलांची मांडणी केली होती.
यावेळी श्रीरामाच्या व राधे कृष्णाच्या जयघोषाने तेल्हारा नगरी दुमदुमली होती. प्रभात फेरीत भक्तांनी पांढरे शुभ्र तर महिलांनी लाल पिवळ्या साड्या परिधान केल्या होत्या. त्यांनी प्रभात फेरी दरम्यान शहरातील सर्व मंदिरांना भेटी देऊन दर्शन घेतले प्रभात फेरी नंतर उपस्थित भाविकांना महाराजांनी प्रबोधन केले. त्यामध्ये त्यांनी ईश्वरप्राप्तीसाठी तथा दैनिक प्रसन्न राहून आरोग्याची जोपासना करण्यासाठी प्रभात फेरीत दैनंदिन सहभाग घ्यावा असे आव्हानही त्यांनी केले. त्याचप्रमाणे सद्विचार परिवाराच्या वतीने नयनी शरण्या उत्तर प्रदेश येथे 8 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर यादरम्यान राधाकृष्ण महाराज यांच्या पावन वाणीतुन भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त भक्तांनी यामध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी सद्विचार परिवाराचे गोपालदास मल अशोक राठी पवन चांडक अशोक मरिया यांच्याकडे आपली नावे नोंदवावी असे आव्हान परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola