ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केल्यामुळे भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने ICC ODI Rankings मध्ये ३ स्थानांची झेप घेतली आहे. तर टीम इंडियाने ICC ODI Rankings मध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दोन्ही संघाविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यामुळे टीम इंडियाने दुसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारताने २-१ ने जिंकली. तर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताने ४-१ असा दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे भारत १२२ गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे.
याशिवाय भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानेदेखील चांगल्या कामगिरीच्या जोरावर ३ स्थानांची झेप घेत १७वा क्रमांक पटकावला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने सलग तीन अर्धशतके ठोकली. तर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याने गरजेच्या वेळी ४८ धावांची मौलिक खेळी केली. त्याच्या बळावर त्याने ३ स्थानांची झेप घेतली असून तो १७व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. याशिवाय कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीच्या यादीत अव्वलस्थानी कायम आहेत.
याशिवाय, भारतीय खेळाडूंमध्ये फिरकीपटू युझवेन्द्र चहल एका स्थान वर सरकून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार ६ स्थानांची बढती घेत १७व्या स्थानी आला आहे. तर फलंदाजीच्या यादीत केदार जाधव ८ स्थाने वर जात ३५ व्या स्थानी विराजमान झाला आहे.
अधिक वाचा : विराट कोहली भारताचा श्रीमंत खेळाडू! फोर्ब्जच्या यादीत धोनी-सचिनलाही टाकलं मागे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola