अकोला (प्रतिनिधी) : महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ रोजी हत्या झाली. देशाच्या विविध भागांतील नद्यांमध्ये त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. अकोल्यापासून १८ किमी अंतरावरील वाघाेली गावात पूर्णा नदीच्या पात्रामध्येही १२ फेब्रुवारी १९४८ रोजी अस्थींचे विसर्जन करण्यात आले होते. या वेळी केळीवेळीचे अॅड. रामसिंह राजपूत यांच्यासह परिसरातील मंडळी उपस्थित होती. या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी अकोला ते गांधीग्राम पायी यात्रा काढून बापूंना आदरांजली वाहण्यात येते. तिथे प्रसादाचे वाटपही करण्यात आले. सर्वोदय मंडळाचे अॅड. रामसिंह राजपूत, महादेवराव भुईभार, प्रा. राजाभाऊ देशमुख, वसंतराव केदार, महादेवराव हुरपडे, बबनराव कानकिरड, डॉ. मिलिंद निवाने यांच्या त्यात सहभाग असताे. गांधीजींच्या अस्थी विसर्जित झाल्याने वाघाेली हे गाव गांधीग्राम म्हणून आेळखले जाऊ लागले. जुने लोक अजूनही त्याचा वाघोली म्हणून उल्लेख करतात.
स्थानिक गांधीवादी नेत्या निर्मलाताई देशपांडे यांचे १ मे २००८ रोजी निधन झाले. त्यांच्या अस्थीही ७ मे २००८ रोजी याच नदीपात्रात विसर्जित करण्यात आल्या. गांधीग्राम येथील महात्मा गांधी विद्यालयामध्ये दरवर्षी ३० जानेवारी रोजी बापूंच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. शाळेच्या आवारातील बापूंच्या पुतळ्याचे पूजन, त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला जातो. गांधीजींचे हे शतकोत्तर सुवर्णजयंती वर्ष असल्याने कार्यक्रमांना त्याप्रमाणे जोड देण्यात आली आहे.
अधिक वाचा : जिथे गांधीजींच्या अस्थी झाल्या विसर्जित ते वाघाेली झाले गांधीग्राम; जयंती-पुण्यतिथीला कार्यक्रम
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola