तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता चाळणी झालेले रस्ते दुरुस्त करण्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवा क्रांती विकास मंचच्या वतीने 29 जानेवारीला खड्डयांची महापूजा करून काही वेळ रस्ता रोको करून सार्वजनिक बांधकाम उपविभागिय कार्यालया समोर धरणे देऊन आंदोलन केले.
युवा क्रांती विकास मंच या सामाजिक संघटनेच्या वतीने तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने व रस्ते खड्डेमय झाल्याने प्रवाशी नागरिक मणक्याच्या आजाराने त्रस्त झाले आहे तसेच एस टी बसेस सह खाजगी वाहन चालवताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे खड्डेमय रस्त्यांमुळे अनेक अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत तर काहींना आपला प्राण सुध्दा गमवावा लागला आहे त्यामुळे रस्त्याचे काम विनाविलंब सुरू व्हावे याकरिता दिनांक 29 जानेवारीला शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवा क्रांती विकास मंचच्या वतीने खड्ड्यांची महापूजा करुन काही वेळ रस्ता रोको करून सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयासमोर धरणे देऊन आंदोलन करण्यात आले या वेळी उपविभागीय अभियंता अविनाश फुटाने यांनी आंदोलना स्थडी भेट दिली असता त्यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी युवा क्रांती विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर, तालुका अध्यक्ष अनंत मानखैर, शहर अध्यक्ष मोहनश्रीवास , मिलिंद दांडगे, गौरव धुळे, संतोष राठी, शेख ताजुद्दीन, विनोद पोहरकार, हुसेन खान, श्याम खारोडे, अंकुश बुरघाटे, विशाल फाटकर , निलेश खेट्टे, राजेश लखन सोनटक्के, काटे, राजेश देशमुख, नितीन मानकर , शुभम सोनोने, विठ्ठल मामनकार , विशाल नांदोकार, अमित काकड, राहुल भिवटे, लखन ठाकूर, रोशन तायडे, योगेश वानखडे ,गणेश भटकर, कैलास श्रीवास, मनोहर फाटकर, सागर टावरी, अंकुश खडसान, विलास बेलाडकर, महेश सुरे इत्यादी युवा क्रांती विकास मंचचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा : अकोट शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट सरसेनापती स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्य विविध सामाजिक उपक्रम
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola