अकोला (प्रतिनिधी) : नागपूरहून नाशिककडे जाणाऱ्या ट्रकने प्रमुख राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील डोंगरगाव फाट्याजवळ अचानक पेट घेतला. ट्रकची केबिन जळाल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकमधून उडी घेत स्वतःचा जीव वाचविला. ही घटना काल दुपारी ४.३० वाजता घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ट्रक चालक मोहम्मद युसुफ (रा. हरियाणा) हे ट्रकने (क्रमांक एनएल – ०१ एन – २३३१) छिंदवाडा व नागपूर येथे माल टाकून नाशिककडे जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर त्यांच्या ट्रकने डोंगरगाव फाट्याजवळ आल्यानंतर अचानक पेट घेतला. ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी ट्रक थांबवून त्यामधून जीव वाचवण्यासाठी उडी घेतली.
चालक मोहम्मद युसुफ यांनी याबाबत बोरगाव मंजू पोलिसांना माहिती दिली. पोलीस व अकोल्यातील अग्निशमन दलाने ही आग विझवली. या आगीत कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मात्र,आगीमध्ये ट्रकचालकाचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. पुढील कारवाई बोरगाव मंजू पोलीस करीत आहे.
अधिक वाचा : चेक अनादर प्रकरणी आरोपीची कारागृहात रवानगी!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 2