बुलढाणा (प्रतिनिधी): चिखली आगाराच्या जळगाव खान्देश-चिखली बसने बुलडाणा शहरातील गणेशनगर परिसरात अचानक पेट घेतल्याने बस अर्धीअधीक जळून खाक झाली. सुदैवाने बसमधील २८ प्रवाशी प्रसंगावधान दाखवून लगोलग बसमधून उतरल्याने मोठा अनर्थ टळला. सोमवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जळगाव खान्देश येथून सकाळी निघालेली ही बस बुलडाणा शहरात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास प्रवेश करती झाली.
गणेश नगर नजीक अचानक बसमधून धूर निघू लागल्याने चालक, वाहकासह, नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत बसमधून बाहेर पडले. गणेश नगरच्या थांब्यावर प्रवाशी उतरणार असल्याने बसचा वेगही कमी झाला होता. बस थांबताच चालकास संभाव्य धोक्याची जाणीव झाली. त्याने लगोलग याची माहिती वाहक व प्रवाशांना दिल्याने मोठी र्दुघटना टळली. या दरम्यानच बसने पेट घेतल्याने बसचे कॅबीन जळण्यास प्रारंभ झाला. तोवर नागरिकांनीही येथे मोठी गर्दी केली होती. याच कालावधीत पालिकेचे अग्नीश्याक दल घटनास्थळी दाखल झाले व त्याने ही आग नियंत्रणात आणली. मात्र तोवर बसचे मोठे नुकसान झाले होते. एमएच-४०-वाय-५३४५ क्रमांकाची ही बस असून ती चिखली आगाराची आहे.
घटनेचे गांभिर्य पाहता राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी ए. यू. कच्छवे व त्यांच्या सहकार्यांनीही घटनास्थळ गाठून परिस्थितीची माहिती घेतली. या बसमध्ये जवळपास २८ प्रवाशी असल्याचे त्यांनी स्पष्ट करीत सर्व प्रवाशी व वाहक आणि चालक सुरक्षीत असल्याचे सांगितले. मोठा अनर्थ टळला बसने पेट घेतला त्या ठिकाणापासून अवघ्या ४०मिटरच्या अंतरावर महावितरणचे ३३ केव्हीचे उपकेद्र आहे. जर तरचा प्रसंग झाला असता तर मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते. सुदैवाने बसचा वेग कमी होता. त्यामुळे प्रवाशाला उतरविण्यासाठी बसही रस्त्याच्या कडेला काही क्षणासाठी थांबल्याने मोठी दुर्घटना टळली, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये. बस लांबपल्ल्याच्या प्रवासी पाठवितांना या बसची पूर्ण तपासणी झाली होती का? यासह अनेक प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होणार आहेत. प्रवाशी सुरक्षेचाही मुद्दा त्यामुळे आता एैरणीवर आला आहे.
अधिक वाचा : अकोल्यात चालत्या ट्रकने घेतला पेट, चालकाने उडी मारुन वाचविला जीव
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola