अकोला (प्रतिनिधी): भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्ह्याच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसदर्भात शासनानाच्या शिक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात उद्या दि.१६ जानेवारी २०१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.
या तिव्र निदर्शनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने लक्षवेधी ठरणार आहे,अशी माहिती सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हाध्यक्ष अमोल समाधान शिरसाठ यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने ३८०० शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतला तो ताक्ताळ मागे घ्यावा,शिक्षक समायोजनाच्या नावाखाली ६००० शिक्षकांच्या बेरोजगार करण्याचा जो निर्णय घेतला तो ताक्ताळ मागे घ्यावा यांसह फेलोशिपसाठी NET परिक्षेची केलेली सक्ती रद्द करावी. या प्रमुख मागण्यांसह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी तीव्र निदर्शने करण्यात येतील.या ठिय्या निदर्शने सम्यक विद्यार्थी आंदोलनचे अकोला जिल्हाध्यक्ष अमोल शिरसाठ यांच्या नेतृत्वात करण्यात येणार असुन प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य सचिव हितेश जामनिक,अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक,राज्य सदस्य राजकुमार दामोदर,भाग्यश्री इंगळे हे राहतील.तरी अकोला जिल्ह्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी पालक शिक्षक वर्गांने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सम्यक विद्यार्थी आंदोलन,भारिप बहुजन महासंघ,महीला आघाडी,युवक आघाडी च्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी केले आहे.असे सम्यक विद्यार्थी आंदोलन महानगर महासचिव पवन गजानन गवई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola