अकोला (प्रतिनिधी) : थकित वीज बील वसूल करण्यासाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या पथकातील कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला आहे. पार्वती नगरमधील ग्राहकाने हा हल्ला केल्याची घटना घडली आहे. विनोद केशव चव्हाण असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
वीज वितरण कंपनीचे वसुली पथक हे दुपारी डाबकी रोड परिसरातील पार्वती नगर येथील वासुदेव पांडुरंग इंगळे याच्या घरी गेले असता, वीज बील न भरल्यामुळे पथकातील कर्मचारी विनोद चव्हाण यांनी इलेक्ट्रिक मीटर बंद करून ते काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी वासुदेव इंगळे व त्याच्या मुलांनी कर्मचारी विनोद चव्हाण यांच्यावर फरशी व लोखंडी पाईपने हल्ला केला.
या प्रकरणी चव्हाण यांनी डाबकी रोड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. पुढील तपास अकोला शहर पोलीस करत आहे.
अधिक वाचा : अकोल्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ७ जण जखमी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola