अडगाव बु(प्रतिनिधी)- जिल्हा परिषद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अडगाव बु येथे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत हेल्थकेअर हा विषय 2015 पासून व्यवसाय शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणाकरिता तसेच रोजगार करिता सुरु केला त्याच अनुषंगाने त्यांना विषयाच्या सखोल ज्ञानासाठी त्यांना इंडस्ट्री व्हिजीट आवश्यक असते त्यामुळे येथील हेल्थकेअर च्या वर्ग 9 व 10 च्या विद्यार्थी यांची इंडस्ट्री व्हिजिट श्रीमती सईबाई मोटे सामान्य रुग्णालय शेगांव येथे दि 29 -12-2018 ला झाली . या भेटीमध्ये रुग्णालय मधील असणाऱ्या वेगवेगळ्या विभागाची जवळून माहिती व चालत असलेल्या कार्याबाबत माहिती मिळाली तसेच बाह्यरुग्ण कक्ष या मध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्नावर होणाऱ्या उपचाराची माहित मिळाली तसेच अपघात कक्ष, अतिदक्षता कक्ष या मध्ये रुग्णाची उपचाराबाबत माहिती तेथील डॉक्टर यांनी दिली तसेच ब्लड बँकचे कार्य तसेच ज्या रुग्णांच्या किडनी काम करत नाही त्या रुग्णांच्या डायलेसिस विभागाची पाहणी करून तेथील रुग्णांचे ब्लड शुद्धीकारण यंत्राची माहिती व रुग्णावर महिन्याला किती वेळ उपचार करावा लागतो या बाबत डॉक्टर यांनी सखोल माहिती दिली.
या इंडस्ट्री व्हिजिट करिता आमच्या शाळेचे प्राचार्य श्री एस .एन. भारसाकळे सर यांनी परवानगी दिली तसेच समग्र शिक्षा अभियानाचे समन्वयक ( लाही ) श्री पाटील सर तसेच विदयांता स्किल चे समन्वयक श्री अक्षय सदांशिव सर कु. एस एस हागोने हेल्थकेअर शिक्षिका यांचे मोलाचे सहकार्य तसेच मार्गदर्शन लाभले.
अधिक वाचा : इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या जनजागृतीस उत्तम प्रतिसाद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola