अकोट(प्रतिनिधी)- ना.आ.श्रीकांत देशपांडे यांनी अकोट दौऱ्यात आज दि, 2 जानेवारी ला लोकजागर मंच कार्यालयास सदीच्छा भेट दिली. ते एका कार्यक्रमासाठी अकोटला आले असता त्यांनी लोकजागर मंच कार्यालयास भेट देत मंच करीत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती घेतली व मंचच्या लोकाभिमुख कार्याची स्तुती केली.
आमदार देशपांडे यांची नुकतीच राज्य सरकारने राज्य शिक्षण हक्क परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती केली असून त्यांना राज्य मंत्री पदाचा दर्जा दिला त्याबद्दल यावेळी त्यांचा लोकजागर द्वारा सत्कार करण्यात आला.यावेळी मंचाचे जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार,शहर अध्यक्ष सुरज शेंडोकार,योगेश जायले,राजू गावंडे,अर्जुन गाळखे,यांनी देशपांडे यांचे स्वागत केले.तसेच मा. ना.श्रीकांतभाऊ यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार, शहराध्यक्ष सूरज शेंडोकार, राजेश गावंडे, योगेश जायले, अर्जुन गाळखे,आकाश बरेठिया, अभिजित कोकाटे,सूरज किटके, चेतन गुरेकार, अक्षय मामनकार,श्याम लटकुटे, विशाल मामनकार,अक्षय मोकाशे,शाम राठी, केशव लोखंडे आदी पदाधिकारी उपस्थीत होते.
अधिक वाचा : अल्पसंख्याक कल्याण करिता निधी कमी पडू देणार नाही -ना जग्गनाथ मोतीराम अभ्यंकर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola