तेल्हारा- येथील स्थानिक पंचशील नगर मध्ये पंचशील मंडळ तर्फे 201 वा भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यात आला. सर्व प्रथम परिसरातील महिला वर्गातर्फ़े भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले. नंतर सुगतानंद संघा तर्फे बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर मनोज पोहरकार या विद्यार्थ्याने अतिशय ऊदबोधक असे भाषण करून उपस्थित लोकांना प्रेरित केले. त्यानंतर भिम गीतांवर नृत्य करून तरुणांनी शौर्य दिनाचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश पोहरकार, संदेश पोहरकार,नितीश गवारगुरु, कपिल पोहरकार,संतोष पोहरकार,राजू वानखड़े यांनी अथक परिश्रम घेतले.
अधिक वाचा : पत्रकारांचा अपमान केल्याबद्दल तेल्हारा पत्रकारांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या उद्धटपणाचा जाहीर निषेध
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola