अकोला :- मा. निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून नियमीतपणे निवडणूकीच्या कामकाजाचा व्हिडीओ कॉन्फरन्सीव्दारे आढावा घेण्यात येतो. त्याअनुषंगाने अकोला जिल्हयातील निवडणूकीच्या कामकाजाबाबत उपविभागीय निहाय आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय उपविभागीय कार्यालयांना भेटी देऊन आढवा घेणार आहे.
जिल्हाधिकारी 14 डिसेंबर 2018 रोजी उपविभागीय कार्यालय अकोट येथे भेट देऊन अकोट व तेल्हारा तहसिलच्या निवडणूक कामकाजाचा आढावा घेणार आहेत. 17 डिसेंबर रोजी उपविभागीय कार्यालय अकोला , 18 डिसेंबर रोजी उपविभागीय कार्यालय बाळापूर, येथे भेट दऊन बाळापूर व पातुर तहसिल च्या निवडणूक कामकाजाचा आढावा घेणार आहे. 19 डिसेंबर मुर्तिजापूर उपविभागीय कार्यालयांना भेट देऊन आढावा घेणार आहे.
या बैठकीत मतदार नोंदणी बाबत फॉर्म नं 6 ,7, 8 व 8 ब बाबत , डीएसई तपासणी बाबत , त्रुटी बाबतच्या सर्व मुदयांबाबत, मतदान केंद्राची तपासणी बाबत, ईलेक्ट्रानिक्स व्होटिंग मशिन व व्हीव्ही पॅटच्या हाताळणीबाबत दिलेल्या प्रशिक्षणा बाबत, मतदार यादीतील दुयम्म अनेकविध नोंद वगळणे, अपात्र व चुकीच्या नोंदी असलेल्या मतदानाच्या नोंदी वगळणे, मयत मतदाराच्या नोंदी वगळणे , महत्वाच्या व्यक्तींची नावाची पडताळणी करून चिन्हांकिंत करणे, दिव्यांग व्यक्तींची नावांची पडताळणी करून चिन्हांकिंत करणे, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान नोंदणी अधिकारी यांनी निकाली काढलेले दावे व हरकतीच्या 2 टक्के तपासणी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दर पंधरवाडयात करावयाची आहे त्याबाबत केलेले नियोजन तसेच निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या इतर विषया बाबतचा आढावा घेण्यात येणार आहे. तरी उपविभागीय कार्यालयातील निवडणूक संबंधीत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
अधिक वाचा : जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 चा प्रारुप आराखडयाबाबत बैठक संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola