अकोला – जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2019-20 चा प्रारुप आराखडा तयार करण्याबाबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली. शासनाने कमाल आर्थिक मर्यादेनुसार तात्पुरते नियतव्यय अन्वये 121 कोटी 92 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्याबाबत निर्देश दिले आहेत. मात्र, विविध यंत्रणांनी 272 कोटी 94 लाख 28 रुपयांची मागणी केली आहे. सदर आराखडा शासनाने निर्धारित करुन दिलेल्या आर्थिक मर्यादेत बसविण्याच्या अनुषंगाने लहान गटासमोर ठेवला जाणार आहे.
नियोजन भवनात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, अकोट येथील वन्यजीव उपवनसंरक्षक गुरुप्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या अनुषंगाने दिवस कमी असल्या कारणाने विविध यंत्रणांनी वेळेत चालु वर्षातील विकास कामांवरील निधी तातडीने खर्च करावा. प्रलंबित कामांच्या प्रशासकीय व तांत्रिक मान्यता तात्काळ घ्याव्यात. निधी अखर्चित राहू नये यासाठी अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतींचा वापर निवडणुक काळात मतदान केंद्र म्हणून होणार आहे, त्यामुळे या इमारतींची दुरुस्ती तातडीने करुन घ्यावी. जलयुक्त शिवारच्या कामाच्या खर्चाचा आढावा घेताना ते म्हणाले की, आपल्या जिल्हयात जलयुक्त शिवार अंतर्गत मोठया प्रमाणात कामे झाली आहेत. त्यामुळे झालेल्या कामांची देयके प्रलंबित ठेवू नयेत, ती संबंधीत विभागांनी तत्काळ अदा करावीत.
प्रारंभी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2019-2020 साठी विभागप्रमुखांनी सादर केलेल्या प्रस्तावांवर चर्चा झाली. कार्यान्वयीन यंत्रणांची मागणी जास्त असल्यामुळे कमाल आर्थिक मर्यादेनुसार मंजुर नियतव्यय अन्वये 121 कोटी 92 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
शासनाने ठरवून दिलेल्या सुत्राप्रमाणे एकूण केंद्र पुरस्कृत योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेकरीता 88 कोटी 7 लाख इतका निधी ठेवणे आवश्यक आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2018-19 अंतर्गत पुनर्विनियोजनकरीता विविध यंत्रणांनी रु. 98 लाख 32 हजार इतकी बचत नोंदवली आहे. तर रु. 18 कोटी 15 लक्ष इतकी अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2018-19 अंतर्गत माहे नोव्हेंबर 2018 अखेरील खर्चाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. रु. 139 कोटी 51 लक्ष इतक्या निधीपैकी रु. 78 कोटी 82 लक्ष 47 हजार इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. या निधीपैकी रु. 57 कोटी 72 लक्ष 66 हजार इतका निधी खर्च झाला असून वितरीत निधीच्या तुलनेत 73 टक्के निधी खर्च झाला आहे.
अधिक वाचा : प्रधानमंत्री आवास योजना : प्रकल्प अहवालाची केंद्रीय चमू कडून तपासणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola