• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कान्हेरीजवळ बोअर केल्यामुळे शहराची मुख्य जलवाहिनी फुटली; शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत

adil by adil
May 18, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
कान्हेरीजवळ बोअर केल्यामुळे शहराची मुख्य जलवाहिनी फुटली; शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत
11
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- कान्हेरी गावाजवळ ग्राम पंचायतीने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरच बोअर खोदण्याचे काम सुरु केले. या प्रकारामुळे मुख्य जलवाहिनी फुटली. परिणामी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला तर दुसरीकडे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला.

शहराला महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. रस्त्याच्या एका बाजूने ६०० मिलिमीटर व्यासाची तर दुसऱ्या बाजूने ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून शहरातील जलकुंभांमध्ये पाणी पोहोचवले जाते. दोन दिवसापूर्वी अशोक वाटिका चौकात मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. आता मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. कान्हेरी ग्राम पंचायतीच्या वतीने रस्त्यालगत सार्वजनिक बोअर खोदण्याचे काम ११ डिसेंबरला सकाळी आठ वाजता सुरु करण्यात आले. बोअर घेताना रस्त्यालगत टाकलेल्या मुख्य जलवाहिनीकडे दुर्लक्ष केल्याने ज्या ठिकाणी ६०० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी आहे,नेमके त्याच ठिकाणी बोअर खोदण्याचे काम सुरु केले. मात्र हे बोअर थेट जलवाहिनीवरच घेतल्याने २० ते २५ फुटा पर्यंत पाण्याचे कारंजे उडू लागले. हे जमिनीतील पाणी नसून जलवाहिनीतील पाणी आहे, ही बाब लक्षात आल्या नंतर जलशुद्धीकरण केंद्रातून ६०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. परंतु तो पर्यंत लाखो लिटर पाणी वाहून गेले. जलवाहिनी फुटल्याची बाब पाणी पुरवठा विभागाला समजल्या नंतर त्वरित दुरुस्तीचे काम सुरु केले. जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्या नंतर या वाहिनीवरील पाणी पुरवठा सुरळीत होईल.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे यापूर्वीचे महान जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीचे १० लाखाचे देयक थकीत आहे. हे देयक देण्यास मनपाकडून टाळाटाळ केली जात आहे. मात्र आता पुन्हा त्याच कंत्राटदाराला मुख्य जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेला पाचारण करावे लागले. दोन दिवसापूर्वी अशोक वाटिका चौकातील व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने जुने शहरासह काही भागांचा पाणी पुरवठा दोन दिवसाने पुढे ढकलला होता. आता ६०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्याने जुने शहरासह बस स्थानक जलकुंभावरून ज्या भागाला पाणी पुरवठा होतो, त्या भागाचा पाणी पुरवठा एक दिवसाने पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

बोअर घेताना ती मुख्य जल वाहिनीवर येवू नये, याची काळजी ग्रा. पं.ने घेणे गरजेचे होते. मात्र ही काळजी ग्रा. पं.ने घेतली नाही. त्यामुळे मनपाला जलवाहिनी दुरुस्तीचा फटका बसला. हे लक्षात घेवून मनपाने जलवाहिनी दुरुस्तीचा खर्च ग्रा, पं.कडे मागितला. तो न दिल्यास ग्रा.पं. विरुद्ध एफआयआर नोंदवण्याचा निर्णय मनपाने घेतला.

अधिक वाचा : जनसामान्यांच्या आरोग्यासाठी अकोल्यात 30 व 31 डिसेंबरला महाआरोग्य अभियान

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

वाशीम जिल्ह्यात गोवर रुबेलाच्या लसीनंतर विद्यार्थिनीचा मृत्यू?

Next Post

#MeToo : साजिद खान वर १ वर्ष निलंबनाची दिग्दर्शक संघटनेची कारवाई

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
साजिद खान

#MeToo : साजिद खान वर १ वर्ष निलंबनाची दिग्दर्शक संघटनेची कारवाई

अकोला

कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व पेन्शन दिले, महापौरांचा सत्कार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.