तेल्हारा : सुख, सुविधा, साधन मिळाल्या नंतर बौद्धिक विकास झाला, परंतु समस्यांचे कारण काय आहे? हा प्रश्न असल्याने बौद्धिक विकासाबरोबर मनाचा विकास होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ब्रम्हकुमारीज आंतरराष्ट्रभय मुख्यालय मधुबनच्या राज्ययोगिनी ब्रम्हकुमारी इंदिरा दिदी यांनी २ डिसेंबर ला प्रजापती ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व् विद्यालय शाखा तेल्हाराच्या वतीने आयोजित आध्यामिक ज्ञान गंगास्थान कार्यक्रमात केले.
मार्गदर्शन करत इंदिरा दिदी पुढे म्हणालात कि, मनोविकार, देह अभिमान वाढत चांगला आहे. समस्यांची दिशा बदलत चालली आहे. परंतु त्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. याबाबत त्यांनी अनेक दाखले दिलेत. मनोबल वाढल्यास शारीरिक बल आपोआप वाढते. अंतरात्म्याकडे लक्ष केंद्रित केल्यास मनोबल आपोआप वाढते. तसेच महाभारतातील कौरव – पांडवा मधील असुरी प्रवृत्ती बाबत विस्तृत असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन गिऱ्हे तर प्रास्ताविक प्रमिला दिदी यांनी केले. यावेळी श्याम बोडखे यांनी स्वागत गीत गायिले. ऍड. विलास जवंजाळ, नगराध्यक्ष जयश्री पुंडकर, सुमन दिदी, प्रमिला दिदी आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यात्मिक ज्ञान गंगा स्थान शिबीर हे सकाळी ७.३० ते ९.०० व दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत पाच दिवस तेल्हारा येथे चालणार आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola