मुर्तीजापुर (शब्बीर खान) : राष्ट्रीय महामार्गावर मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनभोरा कुष्ठरोग धाम नजीक एसटी बस व मालवाहू ट्रक या दोन वाहनात अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी घडली. दरम्यान महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पाहता दिवसा आड छोट्या, मोठ्या अपघाताची मालिका सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार कारंजा आगाराची एसटी बस ( क्रमांक एम. एच. 40 वाय 5911) बुलढाण्या साठी प्रवासी वाहतूक करत असता अकोला कडून मुर्तीजापुर कडे जाणारा मालवाहु ट्रक (क्रमांक एम. एच. 19 झेड 9595)समोरील खड्ड्याचा बचाव करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटून होऊन समोरच्या बसवर आदळला. या अपघातात दोन्ही चालक जखमी झाले. जखमींना उपचारार्थ सामान्य रुग्णालय मुर्तीजापुर येथे दाखल करण्यात आले. बस मधील प्रवाशांना किरकोळ इजा झाली. तर सुदैवाने मोठा अनर्थ टळला. महामार्गावर दिवसाआड होणारे अपघात टाळण्या साठी खड्डे बुजविण्यात यावे अशी वाहन चालकासह सर्व सामान्य जनतेची मागणी होत आहे.
अधिक वाचा : मुर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथे गोठ्यात लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान; जनावरे जखमी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola