बंगळुरू : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) तयार केलेल्या सर्वांधिक वजनदार असलेल्या जीसॅट-११ या उपग्रहाचे आज सकाळी युरोपियन अवकाश संस्थेच्या फ्रेंच गयाना येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण आज बुधवारी मध्यरात्री २.०७ वाजता एरियन-५ रॉकेटच्या साह्याने करण्यात आले.
जी सॅट-११ हा उपग्रह सर्वाधिक वजनदार, मोठा आणि अत्याधुनिक असा उपग्रह आहे. त्याचे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले, अशी माहिती ‘इस्त्रो’चे चेअरमन के. सिवन यांनी दिली आहे. जीसॅट-११ हा उपग्रह भारताची अवकाशातील श्रीमंत संपत्ती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. हा उपग्रह ग्रामीण क्षेत्रातील इंटरनेट क्रांतीसाठी मैलाचा दगड मानला जात आहे. यामुळे देशातील इंटरनेट स्पीड वाढण्यास मदत होणार असल्याचे ‘इस्त्रो’ने म्हटले आहे.
हा कम्युनिकेशन उपग्रह ५,८५४ किलो वजनाचा असून तो पृथ्वीपासून ३६,००० किलोमीटर दूरवर जाणार आहे. उच्च क्षमता असलेला हा उपग्रह पुढील वर्षात देशात प्रत्येक सेकंदाला १०० गीगाबाईट पेक्षा अधिक ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देणार आहे. विशेषतः ग्रामीण भागात यामुळे इंटरनेट क्रांती होईल, असे ‘इस्त्रो’चे चेअरमन के. सिवन यांनी म्हटले आहे.
जीसॅट-११ उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोचे अभिनंदन केले आहे. आपल्या शास्त्रज्ञांच्या कामगिरीचा भारताला अभिमान आहे. हे त्यांचे उल्लेखनीय कार्य प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे.
India is proud of our scientists, who keep innovating and setting high standards of scale, achievements and succcess. Their remarkable work inspires every Indian. @isro
— Narendra Modi (@narendramodi) December 5, 2018
अधिक वाचा : ISRO ने लाँच केला सर्वोत्कृष्ठ इमेजिंग सॅटेलाइट HysIS
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola