हैदराबाद : आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा अंतराळ प्रक्षेपण स्थळावरून गुरुवारी पीएसएलव्ही-सी43 रॉकेटच्या माध्यमांतून भारताने हायसिस (HysIS) सॅटेलाइट लाँच केले आहे. हायसिस भारताचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ठ इमेजिंग सॅटेलाइट आहे.
या उपग्रहाच्या माध्यमातून इस्रोला पृथ्वीची हाय रेझोल्युशन आणि सुस्पष्ट छायाचित्रे मिळणार आहेत. यासोबतच भारत 8 देशांचे इतर 30 सॅटेलाइट सुद्धा प्रक्षेपित केले. त्यामध्ये 1 मायक्रो आणि 29 नॅनो उपग्रहांचा समावेश होता. पोलार सॅटेलाइट लाँच वेहिकल (पीएसएलव्ही) चे या वर्षीचे हे सहावे प्रक्षेपण आहे. प्रक्षेपणाचे काउंटडाऊन बुधवार सकाळी पहाटे 5:58 वाजताच सुरू झाले होते. उपग्रहांना पृथ्वीपासून 504 किमी उंचीवरील कक्षेत स्थापित केले जाणार आहे.
हायसिस केवळ इमेजिंग सॅटलाइट नाही. क्लायमेटच्या हालचालींचा अभ्यास करत असताना या उपग्रहाच्या माध्यमातून पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये होणाऱ्या बदलांवर सुद्धा नजर ठेवता येईल. ज्या देशांचे उपग्रह पाठवण्यात आले त्यामध्ये एकट्या अमेरिकेचे 23 तसेच ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलँड, मलेशिया, नेदरलँड आणि स्पेन अशा देशांचे प्रत्येकी एक-एक उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहे. याच महिन्यात भारतीय अंतराळ संशोधन संघटना इस्रो आणखी एक प्रक्षेपण करणार आहे. तत्पूर्वी 14 नोव्हेंबर रोजी इस्रोने जीसॅट-29 प्रक्षेपित केले होते.
अधिक वाचा : व्हॉट्सअॅपच्या ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ या फिचरमध्ये होणार महत्त्वाचा बदल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola