अकोला – शहरात विविध समस्या असतांना सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी या समस्या सोडवण्यासाठी कमी पडत आहेत त्यात नुकताच जिल्हाधिकारी यांनी 6 रस्त्यांचे सोशल ऑडिट करून संबधीत ठेकेदार दोषी आढळतात त्यांचेवर कारवाई करण्याचे सोडून महापौर विजय अग्रवाल यांनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सभागृहात आक्रमक भूमिका घेत असतात तशीच भूमिका मागील सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे नगरसेवक तथा अकोला महानगरपालिका चे विरोधी पक्षनेते साजीद खान पठाण यांनी घेतली असता त्या सभेत साजीद खान पठाण यांना एक सभेसाठी निसकाशीत केले होते तिथपर्यंत ठीक होते त्यानंतर मात्र महापौर विजय अग्रवाल यांनी साजीद खान पठाण यांना मनपा सदस्यत्व रद्द करण्यासाठी येत्या 22 नोव्हेंबर ला विशेष सर्वसाधारण सभे चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने समस्या मांडणाऱ्या व जनतेतून बहुमत घेऊन निवडून आलेल्या नगरसेवक यांना सदस्यत्व रद्द करणे म्हणजे लोकशाही चा खून करणे आहे हा प्रकार अकोल्यातील सर्वसामान्य जनता खपवून घेणार नाही त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा सत्ता धारी भाजप व महापौर यांच्या भूमिका च्या विरोधात जनता असून साजीद खान पठाण यांच्या समर्थनार्थ जन आंदोलन केले जाणार असून त्या काळात कायदा व सुव्यवस्था ची स्थिती निर्माण झाल्यास त्याला केवळ महापौर अग्रवाल व अकोला मनपा मध्ये सत्ताधारी असलेले च जबाबदार असतील असा इशारा देणारे निवेदन आज जन लोकशाही संगठण ने जिल्हाधिकारी यांना दिले आहे
त्यामुळे भविष्यात निर्माण होत असलेली परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे अशी मागणी निवेदनात केली आहे.
जनलोकशाही संगठनचे संस्थापक अध्यक्ष सैय्यद नासीर यांचे नेतृत्व निवेदन देण्यात आले त्यावेळी एम पी जे के ज़िला अध्यक्ष अतिकर्रहमान, शहज़ाद अनवर डब्लू पी आई के ज़िला अध्यक्ष महमूद उस्मान, अज़हर चौधरी, इमरान खान, सैय्यद जमीर जे के मुन्ना मालिक, रियाज़ मालिक, अनवर खान अदि उपस्तिथ होते.
अधिक वाचा : जिल्ह्यातील 52,800 विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवासासाठी पास
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola