अकोला(प्रतिनिधी): अमरावती विद्यापीठाचा कारभार कसा चालतो हा आज हजारो विद्यार्थ्यांना अनुभवायास मिळाला विद्यापीठयांन सुट्टीच्या दिवशी परीक्षेचा पेपर काढला होता मात्र ऐन 3 दिवस पहिले विद्यापीठाच्या ही चूक लक्षात आल्याने विद्यापीठाचा कारभार कसा चालतो हे लक्षात येते त्यामुळे अमरावती विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या जीवनासह त्यांच्या मानगुटीवर बसला आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळात त्यांच्या मानसिकतेवर घाला घ्यालण्याचा काम विद्यापीठ करीत आहे.
भाऊबीजेला सुट्टी असतांना परीक्षा ठेवण्यात आली होती.मात्र आता पुन्हा ईदच्या दिवशी परीक्षा ठेऊन ती परीक्षा चूक लक्षात आल्यावर रद्द केली. शासकीय कर्मचारी लाखो रुपये पगार घेतात मात्र त्यांना कुठल्याच प्रकारचे भान नसते हे ऐन परीक्षेच्या काळात सुट्टीच्या दिवशी परीक्षा पेपर काढून आपल्या झोप काढू कारभाराचा प्रत्यय दिला.दि 21 नोव्हेबर रोजी जवळपास 18 हजार विद्यार्थ्यांचा शासकीय सुट्टी असलेल्या ईद च्या दिवशी विद्यापीठानं परीक्षा ठेवली होती.परीक्षा वेळापत्रक निघून बरेच दिवस झाल्यानंतर परीक्षेला 3 दिवस बाकी असतांना आज रोजी विद्यापीठाला आपली चूक लक्षात आली आली.विद्यापीठाने लगेच पत्रक काढून संबंधित विद्यालय प्राचार्य तसेच सोशल मीडिया वर पत्रक टाकून विद्यार्थ्यांना याबाबत अवगत केले.मात्र विद्यार्थी परीक्षा म्हटली की आपला जीव पणाला लावतो मात्र जे विद्यापीठ परीक्षा घेत असेल तेच जर विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळत असेल तर हे कुठपर्यंत योग्य आहे असा सवाल पालकवर्ग विचारत आहे.
विद्यापीठाशी आमच्या प्रतिनिधीने सम्पर्क साधला असता त्यांना विद्यापीठाच्या संबंधित अधिकारी यांच्या कडून अफलातून उत्तरे मिळाली त्यांनी सर्व चूक आपल्या खालच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर टाकून काढता पाय घेतला तर जर एखादा कर्मचारी एखादे पत्रक काढत असेल तर ते मंजूर करन शहानिशा करणे संबंधित अधिकारी यांचे काम असते मात्र फक्त मलिदा लुटण्याचे तसेच गलग्नड पगार घ्यायचा एवढेच काम हे अधीकारी करीत असल्याचे झालेल्या प्रकारावरून लक्षात येते.
सदर प्रकाराबद्दल शिक्षण मंत्री तसेच अमरावती विद्यापीठ कुलगुरू नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे पालकवर्गाचे लक्ष लागले आहे.