दिवाळीनिमित्त भारतीय युजर्ससाठी फेसबुकनं एक वेगळी भेट आणली आहे. फेसबुकनं दिवाळीसाठी ‘Diwali Stories’ हे नवं फीचर लाँच केलं आहे. ७ नोव्हेंबर म्हणजे आजपासून हे फीचर उपलब्ध आहे. दिवळीतल्या सर्वात खास क्षणाचे फोटो युजर्सला या फीचरद्वारे शेअर करता येणार आहे. मात्र हे फीचर केवळ इंग्रजीत उपलब्ध करण्यात आलं आहे.फेसबुक लॉगिन केल्यानंतर ‘Share your Stories this Diwali’ या पर्यायाद्वारे युजर्सना दिवाळीतले सर्वात सुंदर क्षणांचे फोटो शेअर करता येणार आहे. newsfeed या आयकॉनमध्ये दिवाळी स्टोरीज हा पर्याय उपलब्ध होणार आहे. याद्वारे दिवाळीतले काही खास फोटो, व्हिडिओ, बुमरँग, लाइव्ह व्हिडिओ युजर्सना शेअर करता येतील. याव्यतिरिक्त फोटोंसाठी काही फिल्टरही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रतिस्पर्धी अॅपच्या तुलनेत फेसबुकमध्ये अनेक फीचर कमी होते त्यातलं फेसबुक स्टोरी हे फीचर फेसबुकनं काही महिन्यांपूर्वी आणलं होतं. या फीचरचा जास्तीत जास्त वापर युजरनं करावा यासाठी फेसबुक नेहमीच प्रयत्नशील असतं म्हणूनच भारतीय युजर्सचा विचार करून फेसबुकनं हे फीचर आणलं आहे.
अधिक वाचा : व्हॉट्सअॅपच्या ग्रुप चॅटमध्ये मिळणार ‘Private Reply’ फीचर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola