नवी दिल्ली – व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअॅपने त्यांच्या अॅऩ्ड्रॉईड बीटा युजर्ससाठी एक नवीन फीचर आणलं आहे. नव्या अपडेटसह आलेल्या या फीचरच्या माध्यमातून युजर्सना ग्रुप चॅटमध्ये Private Reply चा खास पर्याय मिळणार आहे.
Private Reply फीचरमुळे व्हॉट्सअॅप युजर्स ग्रुप चॅटच्या दरम्यान कोणत्याही एका व्यक्तीला वेगळा मेसेज, व्हॉइस कॉल किंवा व्हिडीओ कॉल करता येणार आहे. यासाठी ग्रुपमधून बाहेर येण्याची गरज नाही. या फीचरच्या माध्यमातून पाठवण्यात आलेले मेसेज हे केवळ पाठवणारा आणि ज्याला ते मेसेज पाठवण्यात आले आहे ती व्यक्तीच ते पाहू शकते. ग्रुपमधील इतर सदस्यांना हे मेसेज मिळणार नाहीत. Private मेसेज पाठवण्यासाठी आधी तो मेसेज सिलेक्ट करावा लागेल.
सिलेक्ट केल्यानंतर ग्रुप चॅटमध्ये वरती असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर कॉपी, मेसेज, व्हॉइस कॉल आणि व्हिडीओ कॉल असे चार पर्याय मिळतील. त्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडू शकता.
अधिक वाचा : नवे सिमकार्ड घेण्यासाठी चुकूनही आधार क्रमांक देऊ नका!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola