अकोला(प्रतिनिधी): जनता समस्या निवारण सभेच्या माध्यमातून अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अधिकाऱ्यांच्या सकारात्मकतेमुळे जनतेच्या तक्रारींचे जलदगतीने निरासन होत आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
आजपर्यंत झालेल्या जनता समस्या निवारण सभेतील निरसण झालेल्या तक्रारींचा आज पालकमंत्री यांनी लोकशाही सभागृहात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी राजेश खवले, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी उज्वल चोरे आदींसह उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
जनता समस्या निवारण सभेमुळे जनतेच्या तक्रारी जलदगतीने मार्गी लागत आहेत, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, या कामामध्ये प्रशासनाचा मोठा वाटा आहे. अधिकाऱ्यांच्या सकारात्मक कामामुळे वेगाने तक्रारी सुटत आहेत. याबददल सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन. अधिकाऱ्यांनी आपल्याच स्तरावर तक्रारींचे निरसन करण्यास प्राधान्य दयावे. त्यासाठी छोटे-मोठे उपक्रम राबवून तक्रारी सोडवाव्यात जेणेकरुन नागरिकांनाही दिलासा मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola