नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी ने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. २०१७च्या महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये झूलनने चमकदार कामगिरी केली होती.
३५ वर्षीय झूलनने ६८ टी-२० सामन्यांत ५६ बळी टिपले आहेत. २००५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात तिने ५ बळी टिपले होते. २००६ मध्ये इंग्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी झूलन यावर्षी जूनमध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचा टी-२० सामना खेळली.
झूलनने निवृत्तीची घोषणा करताना आपले संघ सहकारी आणि बीसीसीआयचे आभार मानले आहेत. तर महिला क्रिकेट संघ आणि बीसीसीआयनेही झूलनने दिलेल्या योगदानाचा गौरव करत तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : Asian Games 2018: 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात राही सरनोबत ने जिंकले सुवर्णपदक