Xiaomi Mi A2 या स्मार्टफोनची आज देशात पहिल्यांदाच विक्री सुरू होत आहे. आज दुपारी 12 वाजेपासून Amazon आणि mi.com वरुन हा स्मार्टफोन खरेदी करता येईल. गेल्या महिन्यात स्पेनमध्ये झालेल्या आपल्या ग्रँड इव्हेंटमध्ये कंपनीने Mi A2 आणि Mi A2 Lite हे दोन स्मार्टफोन सादर केले होते. या दोन्ही फोनबाबत मागच्या काही दिवसांपासून बरीच चर्चा होती. अखेर आजपासून Mi A2 ची विक्री सुरू होत आहे.
या फोनच्या मागच्या बाजूला 20 आणि 12 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. तर सेल्फीप्रेमींसाठी पुढील बाजूसही 20 मेगापिक्सल कॅमेरा आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 16 हजार 999 रुपये आहे. याशिवाय या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेलं व्हेरिअंटही असेल असं सांगण्यात येत आहे, मात्र या व्हेरिअंटची किंमत किती असणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. हा फोन खरेदी केल्यास रिलायन्स जिओकडून ग्राहकांना 4.5 टीबी अतिरिक्त डेटा देण्यात येत आहे. तसंच या फोनवर 2,200 रुपयांच्या इन्स्टंट कॅशबॅकची ऑफरही देण्यात आली आहे.
स्पेसिफिकेशन –
डिस्प्ले : 5.99 इंच
प्रोसेसर : 1.8GHz ऑक्टाकोर
फ्रंट कॅमेरा : 20-मेगापिक्सल
रिजोल्युशन : 1080×2160 पिक्सल pixels
रॅम : 4GB
ओएस : Android 8.1 Oreo
स्टोरेज : 64GB / 128GB
रिअर कॅमेरा : 20-मेगापिक्सल
बॅटरी : 3000mAh
अधिक वाचा : भारतात लॉन्च झाले ब्लॅकबेरी चे हे स्मार्टफोन्स– Evolve आणि Evolve X
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola