भांबेरी(पवन महल्ले)- एकीकडे स्वातंत्र्य दिन हा हॉलिडे म्हणून साजरा करतात तर काहींना त्याची खरच जाणीव असते. शेतामध्ये राब राब राबून सुद्धा १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची जाणीव ठेवून माझा बळीराजाचे किती आपल्या माय भूमीवर प्रेम आहे हे अकोला जिल्यातील भांबेरी येथील शेतकरी व शेतमजुरांनि दाखवून दिले. खुद्द शेतामध्ये तिरंगा एका काठीला बांधून त्याला मानवंदना देऊन राष्ट्रगीत गायिले.भांबेरी येथील शेतकरी ऋषिकेश निमकर्डे यांच्या शेतात सदर स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला.त्या नंतर शेतातील कामांना सुरुवात केली.यावेळी मात्र एक वेगळीच खुशी शेतकरी व शेतमजुरांच्या चेहऱ्यावर दिसून आली.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola